शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीकविमा भरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : खरीप हंगामातील पिकांची पेरणी जोरात सुरू आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमधून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : खरीप हंगामातील पिकांची पेरणी जोरात सुरू आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमधून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी पीकविमा भरण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासाठी अंतिम तारीख ही १५ जुलै आहे.

यावर्षी खरीप हंगामाचे क्षेत्र ७ लाख ९१ हेक्टर इतके आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, कांदा, बाजरी, मका, खरीप ज्वारी, भुईमूग आदी पिके घेतली जातात. दरम्यान, शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरलेले न उगवणे, हवामानातील बदलामुळे झालेले नुकसान, काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात घट, काढणीपश्चात नुकसान, स्थानिक आपत्ती इत्यादी बाबींकरिता विम्याचे संरक्षण मिळणार आहे. अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरणे सुलभ व्हावे, यासाठी गावपातळीवर अधिकची सुविधा म्हणून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राद्वारे व बँकेमार्फत योजनेत सहभागी होता येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन प्रतिकूल परिस्थितीत पिकांना संरक्षण घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

....

पीकविमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, शेतजमिनीचा ७/१२ उतारा, स्वयंघोषित पेरणी प्रमाणपत्र, जर कुळासाठी लाभ घ्यायचा असेल तर भाडेपट्टी करार असलेला शेतकऱ्यांचा करारनामा देणे आवश्यक आहे. तसेच ही योजना ऐच्छिक असल्याने कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर त्यांनी विहित मुदतीत कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस तसे लेखी कळविणे अनिवार्य आहे.

पिकांच्या संरक्षणासाठी पीकविमा शेतकरी दरवर्षी भरतात. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्व नियमांचे पालन करून पीकविमा भरावा. आपले सरकारवर विमा हप्त्याव्यतिरिक्त जादा रक्कम देण्याची आवश्यकता नाही. तसे केल्यास त्या केंद्राविरुद्ध तक्रार करावी. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

-दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड

....

खरीप हंगामासाठी संरक्षित रक्कम,

शेतकरी विमा हप्ता

पीकविमा संरक्षित रक्क्म प्रतिहेक्टरी शेतकरी विमा हप्ता प्रतिहेक्टर

सोयाबीन ४५००० ९०० कापूस ४५००० २२५० कांदा ६५००० ३२५० बाजरी २२००० ४४० मका ३०००० ६०० तूर ३५००० ७०० मूग २०००० ४०० उडीद २०००० ४०० भुईमूग ४५००० ९०० खरीप ज्वारी २५००० ५००