शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या प्रकरणाचे अहवाल देण्यास दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:33 IST

अनेक ठिकाणी संबंधित पोलिसांकडून शेतकरी आत्महत्येप्रकरणी अहवाल वेळेवर दिला जात नसल्यामुळे अंतिम अहवाल तयार होण्यास दिरंगाई होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात नापिकी, अतिवृष्टीमुळे गत काही दिवसांपासून शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच आहे. शेतकरी आत्महत्येसंदर्भात अहवाल देण्यासाठी एक समिती स्थापन केलेली असते. यामध्ये विविध विभागांचा समावेश असतो. मात्र, अनेक ठिकाणी संबंधित पोलिसांकडून शेतकरी आत्महत्येप्रकरणी अहवाल वेळेवर दिला जात नसल्यामुळे अंतिम अहवाल तयार होण्यास दिरंगाई होत आहे.जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, प्रत्येक महिन्याकाठी शेतकरी आत्महत्येची सरासरी १५ आहे. ती आत्महत्या पात्र ठरल्यानंतर संबंधित शेतकरी कुटुंबाला शासनाकडून मिळणारे लाभ दिले जातात. त्यासाठी सर्व तालुकास्तरावर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, ठाणेप्रमुख यांची समिती गठीत केलेली असते. त्यांनी मिळून शेतकरी आत्महत्येच्यासंदर्भात अहवाल देणे गरजेचे असते मात्र, संबंधित पोलीस ठाण्यांकडून शेतकरी आत्महत्येचा अहवाल दिला जात नसल्यामुळे अंतिम अहवाल देण्यास विलंब होत आहे.अंतिम अहवाल कालमर्यादेत पूर्ण होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गेवराई तहसीलदारांना नोटीस दिली होती. या नोटीसला उत्तर देताना पोलीस ठाणे प्रमुखांकडून आत्महत्येसंदर्भातील अहवाल दिला जात नसल्यामुळे अंतिम अहवाल पाठवण्यास दिरंगाई होत असल्याचे तहसीलदारांनी नमूद केले आहे. यामध्ये विशेषत: चकलंबा पोलीस ठाणे प्रमुखाकडून अहवाल न आल्याचे उल्लेख केला आहे. यामुळे पोलिसांना शेतकरी आत्महत्येसंदर्भात गांभीर्य नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे.शासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत केली जाते. यामध्ये आर्थिक मदतीसह विविध योजनांचा लाभ त्यांना दिला जातो. मात्र, शेतकरी आत्महत्येची कारणे व अहवाल आल्यानंतर ती पात्र किंवा अपात्र याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हे अहवाल सर्व विभागाकडून तात्काळ पाठवण्याच्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना सूचना दिलेल्या आहेत.जिल्ह्यातील बीड आणि गेवराई तालुक्यातील शेतकरी आत्महत्येचे अहवाल कालमर्यादेमध्ये दिले जात नहीत. यासंदर्भात संबंधित तहसीलदार यांच्याशी जिल्हा प्रशासनाकडून संपर्क केला असता, पोलीस ठाण्यांकडून अहवाल दिले जात नाहीत असे उत्तर दिले जाते.४मात्र, तहसीलदारांनी वेळोवेळी अहवालासाठी संबंधित ठाण्यांकडे संपर्क करणे गरजेचे आहे. त्यांच्याकडूनही योग्य कार्यवाही होत नाही. तहसीलदारांनी योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करु असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAgriculture Sectorशेती क्षेत्रGovernmentसरकार