कांदा काढणीत शेतकरी कुटुंब व्यस्त; इकडे चोरांनी घरफोडून लाखोंचा ऐवज केला लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 16:59 IST2023-12-16T16:56:01+5:302023-12-16T16:59:28+5:30
या प्रकरणी आष्टी पोलिस पुढील तपास करत आहेत

कांदा काढणीत शेतकरी कुटुंब व्यस्त; इकडे चोरांनी घरफोडून लाखोंचा ऐवज केला लंपास
- नितीन कांबळे
कडा- कुटुंब शेतात कांद्याची काढणी करण्यासाठी गेले असताना घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी शेतकऱ्याचे घरफोडल्याचा प्रकार हाजीपूर येथे १५ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. सोने व रोख रक्कम असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
आष्टी तालुक्यातील हाजीपूर येथील शेतकरी मधुकर गणपत रेडेकर हे १५ डिसेंबर रोजी कुटुंबासह शेतातील कांद्याची काढणी करण्यासाठी गेले होते.हीच संधी साधत चोरट्यानी घरात प्रवेश करत कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. रेडेकर कुटुंब रात्री शेतातून परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात मधुकर गणपत रेडेकर यांच्या फिर्यादीवरून चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार काळे करीत आहेत.