बनावट नोटा प्रकरण: केजच्या माजी सरपंचासह व्यापाऱ्याचा जामीन तामिळनाडू न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:27 IST2026-02-04T17:26:46+5:302026-02-04T17:27:13+5:30

महाराष्ट्रात पळून जाण्याची भीती; ८ लाखांच्या बनावट नोटांचे कनेक्शन

Fake currency case: Tamil Nadu court rejects bail of former Kej sarpanch and businessman | बनावट नोटा प्रकरण: केजच्या माजी सरपंचासह व्यापाऱ्याचा जामीन तामिळनाडू न्यायालयाने फेटाळला

बनावट नोटा प्रकरण: केजच्या माजी सरपंचासह व्यापाऱ्याचा जामीन तामिळनाडू न्यायालयाने फेटाळला

केज (जि. बीड) : तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्हा न्यायालयाने बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींचा जामीन सोमवारी फेटाळून लावला. यामध्ये केज तालुक्यातील डोका गावचे माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे (वय ५४) आणि कृषी पंप व्यापारी नारायण राम पटेल (वय ३४) यांचा समावेश आहे.

थुवाकुडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचा आरोप या दोघांवर आहे. या प्रकरणी तिरुचिरापल्ली जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, बनावट चलनी नोटा चलनात आणणे हा गंभीर आर्थिक गुन्हा असून, प्रकरणाचा तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याने न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन देण्यास नकार दिला. विशेष सहायक सरकारी वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला की, आरोपी महाराष्ट्रातील रहिवासी असल्याने जामीन मिळाल्यास ते पळून जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच, या प्रकरणातील चार स्थानिक साथीदार अद्याप फरार असून, आरोपी बाहेर आल्यास तपासात आणि फरार साथीदारांच्या शोधात अडथळे निर्माण होऊ शकतात. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला.

चार फरार आरोपींच्या शोधात पथक
थुवाकुडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कमलहासन यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक थिरुवेरुंबूर येथील चार स्थानिक संशयितांचा शोध घेत आहे. या टोळीने २०० रुपयांच्या एकूण ८ लाख ३७ हजार ८०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्यास मदत केल्याचा संशय आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात आणि विशेषतः केज तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title : नकली नोट मामले में जमानत खारिज: पूर्व सरपंच, व्यापारी जेल में

Web Summary : तमिलनाडु की अदालत ने नकली 200 रुपये के नोट चलाने के आरोप में गिरफ्तार महाराष्ट्र के बीड के एक पूर्व सरपंच और व्यापारी की जमानत याचिका खारिज कर दी। पुलिस 8.3 लाख रुपये के घोटाले में शामिल चार साथियों की तलाश कर रही है।

Web Title : Bail Denied in Fake Currency Case: Ex-Sarpanch, Trader Jailed

Web Summary : Tamil Nadu court rejected bail for an ex-Sarpanch and trader from Beed, Maharashtra, arrested for circulating counterfeit 200-rupee notes. Investigation continues, with police seeking four accomplices involved in the 8.3 lakh rupee scam.