पाटोदा पंचायत समितीचा विस्तार अधिकारी १० हजाराची लाच घेताना पकडला
By सोमनाथ खताळ | Updated: October 4, 2023 16:30 IST2023-10-04T16:30:12+5:302023-10-04T16:30:46+5:30
वर्षभराच्या सिझनमध्ये कारवाई न करण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी दहा हजाराची मागणी

पाटोदा पंचायत समितीचा विस्तार अधिकारी १० हजाराची लाच घेताना पकडला
बीड : वर्षभराच्या सिझनमध्ये कारवाई न करण्यासाठी व कृषिसेवा केंद्र दुकानातील औषधांचे सॅम्पल न घेण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतील विस्तार अधिकाऱ्याने दहा हजारांची लाच मागितली. ती स्विकारतानाच धाराशिवच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी पाटोदा शहरात करण्यात आली.
जयश मुकूंद भुतपल्ले (वय ३६, विस्तार अधिकारी कृषि, वर्ग-३, पंचायत समिती पाटोदा) असे लाच स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने तक्रारदाराकडून तुमच्या कृषि सेवा केंद्र दुकानातील औषधाचे सॅम्पल न घेण्यासाठी व वर्षभराच्या सिझनमध्ये कारवाई न करण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी दहा हजाराची मागणी केली होती. यामध्ये दहा हजाराची रक्कम घेताना भुतपल्ले याला धाराशिव एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, पोलीस उपअधीक्षक धाराशीव सिद्धराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस अंमलदार विशाल डोके, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, दत्तात्रय करडे यांनी केली.