वीज बिले वाढू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST2021-07-25T04:28:12+5:302021-07-25T04:28:12+5:30

घंटागाडी येईना अंबाजोगाई : शहरातील भटगल्ली, जैन गल्ली परिसरात येणारी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा पडून ...

Electricity bills began to rise | वीज बिले वाढू लागली

वीज बिले वाढू लागली

घंटागाडी येईना

अंबाजोगाई : शहरातील भटगल्ली, जैन गल्ली परिसरात येणारी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा पडून राहत आहे. गाडी नियमित व वेळेवर सोडून जागोजागी स्वच्छतेची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

खोलीकरण गरजेचे

अंबाजोगाई : तालुक्यातील बर्दापूर, नांदगाव, सुगाव या परिसरात असणाऱ्या पाझर तलावाचे खोलीकरण करावे. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असला तरी या परिसरातील तलाव कोरडे पडू लागले आहेत. या तलावांच्या खोलीकरणाची मागणी होत आहे.

केबल चोरी वाढली

अंबाजोगाई : तालुक्यात सध्या शेतातील उसाला पाणी देणे सुरू आहे. मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यांतून शेतीला पाणी सोडण्यात आले होते. विद्युतपंप चालवण्यासाठी केबल अंथरण्यात आले होते. या केबलची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.

मास्क दिसेना

बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Electricity bills began to rise