शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध फिरवत आहेत लसीकरणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:31 IST

माजलगाव: कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आरोग्य विभागाकडून कोव्हिड शिल्ड लस नागरिकांना देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने माजलगाव ग्रामीण रुग्णालयासह पाच प्राथमिक ...

माजलगाव: कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आरोग्य विभागाकडून कोव्हिड शिल्ड लस नागरिकांना देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने माजलगाव ग्रामीण रुग्णालयासह पाच प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत ५ हजार ५८४ नागरिकांना ही लस देण्यात आली असल्याची माहिती, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर घुबडे यांनी दिली आहे.

माजलगाव येथील ग्रामीण रूग्णालयात २५ जानेवारीपासून कोव्हिड शिल्ड लसीकरणास सुरूवात करण्यात आली होती. याठिकाणी सोमवार पर्यंत ४ हजार ११५ नागरिकांना लस देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रात १ मार्च रोजी लसीकरणास सुरूवात होऊन सोमवारपर्यंत १हजार ४६९ नागरिकांना लस देण्यात आली. आरोग्य विभागाने पहिल्या टप्यात आजाराने ग्रासलेले, वयोवृध्द नागरिकांना प्राधान्य दिले होते. मात्र वृध्द नागरिकांनी कोव्हिड शिल्ड लसीकरणाकडे पाठ फिरवली. ४५ ते ६० च्या वयाच्या विविध आजाराने ग्रासलेल्या नागरिकाचे लसीकरणास प्रतिसाद दिल्याचे दिसुन येते.

एकीकडे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी हे घरोघरी जावून वृध्द नागरिकाना कोव्हिड शिल्ड लसीचे महत्व सांगून लस घेण्याची जनजागृती करत आहेत. तरी वृध्द लसीकरणाकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांनी भिती न बाळगता कोव्हिड शिल्ड लस घ्यावी. या लसीचे कसल्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे वृध्द नागरिकांनी जास्तीत जास्त लस घेऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे.

- डॉ.मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी माजलगाव