शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध फिरवत आहेत लसीकरणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:31 IST

साडेपाच हजार नागरिकांना दिली लस माजलगाव: कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आरोग्य विभागाकडून कोव्हिड शिल्ड लस नागरिकांना देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ...

साडेपाच हजार नागरिकांना दिली लस माजलगाव: कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आरोग्य विभागाकडून कोव्हिड शिल्ड लस नागरिकांना देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने माजलगाव ग्रामीण रुग्णालयासह पाच प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत ५ हजार ५८४ नागरिकांना ही लस देण्यात आली असल्याची माहिती, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर घुबडे यांनी दिली आहे.

माजलगाव येथील ग्रामीण रूग्णालयात २५ जानेवारीपासून कोव्हिड शिल्ड लसीकरणास सुरूवात करण्यात आली होती. याठिकाणी सोमवार पर्यंत ४ हजार ११५ नागरिकांना लस देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रात १ मार्च रोजी लसीकरणास सुरूवात होऊन सोमवारपर्यंत १हजार ४६९ नागरिकांना लस देण्यात आली. आरोग्य विभागाने पहिल्या टप्यात आजाराने ग्रासलेले, वयोवृध्द नागरिकांना प्राधान्य दिले होते. मात्र वृध्द नागरिकांनी कोव्हिड शिल्ड लसीकरणाकडे पाठ फिरवली. ४५ ते ६० च्या वयाच्या विविध आजाराने ग्रासलेल्या नागरिकाचे लसीकरणास प्रतिसाद दिल्याचे दिसुन येते.

एकीकडे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी हे घरोघरी जावून वृध्द नागरिकाना कोव्हिड शिल्ड लसीचे महत्व सांगून लस घेण्याची जनजागृती करत आहेत. तरी वृध्द लसीकरणाकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांनी भिती न बाळगता कोव्हिड शिल्ड लस घ्यावी. या लसीचे कसल्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे वृध्द नागरिकांनी जास्तीत जास्त लस घेऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे.

- डॉ.मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी माजलगाव