शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत २१ कावळे व तीन चिमण्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:30 IST

शिरूर कासार : तालुक्यात आठ दिवसांत २१ कावळे व तीन चिमण्यांचा मृत्यू झाला. यापैकी पाडळी येथील मृत पक्ष्यांचा ...

शिरूर कासार : तालुक्यात आठ दिवसांत २१ कावळे व तीन चिमण्यांचा मृत्यू झाला. यापैकी पाडळी येथील मृत पक्ष्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने पशुवैद्यकीय विभागाचे सर्व डाॅक्टर व कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी दिली.

कुक्कुटपालकांनी घाबरून न जाता वेळोवेळी पशुवैद्यकीय दवाखाना व डाॅक्टरांशी संपर्कात रहावे तसेच काळजीसुध्दा घेणे जरूरी आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणे जरूरी आहे. त्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतीची मदत घेणे,कोंबड्यांचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहे,अहवाल आल्यानंतरच कोंबड्यामधे या रोगाचा संसर्ग झाला किंवा नाही हे स्पष्ट होईल,सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत सतर्क राहण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. बर्ड फ्लू हा संसर्गजन्य असल्याने सर्वांनीच काळजी घेणे जरूरीचे आहे. पक्ष्यांमध्ये असाधारण मरतुक आढळून आल्यास त्याला न हाताळता त्याची अगदी शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावावी तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात रहावे, असे आवाहन डॉ. आघाव यांनी केले.

तालुक्यात कावळ्याबरोबर चिमण्यांचा मृत्यू झाला, मात्र आतापर्यंत कोंबडी मरतुक नसल्याचे सांगण्यात आले. १२ ते २० जानेवारीदरम्यान आठ दिवसांत पाडळी येथे २,जाटनांदूर १,पिंपळनेर १,राक्षसभुवन ५,तिंतरवणी १,शिरूर १,तर रायमोहा येथे ५ कावळे मृत पावले तर पिंपळनेर २ व घोगसपारगाव येथे १ चिमणी मृत पावल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातून १०६ कुक्कुट पक्ष्यांचे नमुने बुधवारी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.