ईडीने माझीही चौकशी केली, पण काम पाहून उलटे केले कौतुक; राष्ट्रवादीच्या आमदाराचा खुलासा

By अनिल लगड | Published: August 29, 2022 01:56 PM2022-08-29T13:56:18+5:302022-08-29T13:59:33+5:30

ज्यांचे बँकेत अकाउंट नाही. त्यांची देखील ईडी चौकशी करीत आहे

ED questioned me too, but appreciated the work; Sensational disclosure of NCP MLA Nilesh Lanke | ईडीने माझीही चौकशी केली, पण काम पाहून उलटे केले कौतुक; राष्ट्रवादीच्या आमदाराचा खुलासा

ईडीने माझीही चौकशी केली, पण काम पाहून उलटे केले कौतुक; राष्ट्रवादीच्या आमदाराचा खुलासा

googlenewsNext

बीड : महाराष्ट्रात सध्या चुकीच्या पध्दतीने राजकारण सुरू आहे. फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच ईडी कारवाया करीत आहे. माझ्याकडे देखील चौकशीसाठी हरियाणा, पंजाबमधील ईडीचे पथके आली होती. पण माझ्याकडे काहीच नाही. यामुळे त्यांनी चौकशी करुन माझे कौतुक देखील केले, असा खुलासा पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आष्टी तालुक्यात एका कार्यक्रमात केला.

आष्टी तालुक्यातील कडा येथील अमोलक जैन महाविद्यालयात रविवारी (२८ ऑगस्ट) नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून आमदार निलेश लंके बोलत होते. मी सामान्य माणूस आहे. मी फक्त लोकांची कामे करतो. मी बँकेत फक्त निवडणुकीपुरते अकाउंट उघडले आहे. यावरून ते म्हणाले, ज्यांचे बँकेत अकाउंट नाही. त्यांची देखील ईडी चौकशी करीत आहे, असा आरोपही लंके यांनी यावेळी केला. 

मी देखील बेरोजगार होतो..
मी देखील बेरोजगार होतो. त्यामुळे तरुणाला रोजगार नसला तर त्याची किंमत असते हे मला माहीत आहे. म्हणून मी आतापर्यंत १५ हजार लोकांना रोजगार दिला आहे. आमदार बाळासाहेब आजबे यांनी आयोजित केलेला रोजगार मेळाव्यातून युवकांना नक्कीच रोजगार मिळेल, असेही आमदार लंके यावेळी म्हणाले.

Web Title: ED questioned me too, but appreciated the work; Sensational disclosure of NCP MLA Nilesh Lanke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.