अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरच्या धडकेत तरुणी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 17:26 IST2018-11-15T17:22:24+5:302018-11-15T17:26:39+5:30
शहरापासून जवळ असलेल्या पाढंरवाडी फाटा येथे आज सकाळी ११ वाजता अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टॅक्टरने बाईकला जोरदार धडक दिली

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरच्या धडकेत तरुणी ठार
गेवराई (बीड ) : शहरापासून जवळ असलेल्या पाढंरवाडी फाटा येथे आज सकाळी ११ वाजता अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टॅक्टरने बाईकला जोरदार धडक दिली. यात बाईकवरून जाणारी एक १६ वर्षीय तरुणी जागीच ठार झाली तर तिचे वडील गंभीर जखमी आहेत.
निकिता रामदास जाधव असे मृत तरुणीचे नाव तिचे वडील रामदास जनार्दन जाधव (40) हे गंभीर जखमी आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कोमलवाडी येथे राहणारे रामदास जाधव कामानिमित्त गेवराईकडे दुचाकीवरून मुलीसह येत होते. सकाळी ११ वाजेच्या दरम्यान पाढंरवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरने पाठीमागून धडक दिली. यात निकिता जागीच ठार झाली. तर जाधव हे गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे नेण्यात येत आहे. या अपघातानंतर ट्रक्टर रस्त्या लगतच्या एका हॉटेलमध्ये घुसला मात्र सकाळी असल्याने येथे कोणी नव्हते. यामुळे पुढील अनर्थ टाळला.