शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकाच्या रखडलेल्या कामांसाठी परिवहन मंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST

आष्टी : आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांच्या रखडलेल्या कामांसंदर्भात मुंबई मंत्रालय येथे परिवहनमंत्री अनिल परब यांची ...

आष्टी : आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांच्या रखडलेल्या कामांसंदर्भात मुंबई मंत्रालय येथे परिवहनमंत्री अनिल परब यांची आ. सुरेश धस यांनी भेट घेतली. बसस्थानकांच्या प्रलंबित व महत्त्वपूर्ण विषयावर बैठक झाली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आ. सुरेश धस यांनी केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवत तत्काळ मार्गी लावू, अशा ‘शब्द’ दिला.

बसस्थानक बंद असल्याने गैरसोय होऊन सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. तत्काळ तिन्ही तालुक्यातील रखडलेल्या बसस्थानकाचे कामे सुरू करावेत तसेच उपलब्ध सेवासुविधा व अन्य समस्या तसेच निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी यावेळी केली.

दरम्यान, बसस्थानकासंदर्भात येणाऱ्या अडचणी व सर्व बाबींवर विचारविनिमय करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे कार्यकारी संचालक, औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक,

बीड विभागाचे विभाग नियंत्रक तसेच स्थापत्य अभियंत्यांची संयुक्त

बैठक आपल्या दालनामध्ये तातडीने आयोजित करावी व त्यासाठी वेळ व दिनांक लवकरात लवकर निश्चित करावा, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी केली.

---

बैठकीत या विषयांवर चर्चा

१) गेल्या दोन वर्षांपासून आष्टी बसस्थानकाचे काम बंद आहे. कडा (ता. आष्टी) येथील बसस्थानकाच्या जागेची मोजणी करून ग्रामपंचायत कार्यालय कडा व परिवहन महामंडळाचा वाद मिटवावा.

२) पाटोदा येथील महासांगवी रोड येथील परिवहन महामंडळाची (जुने बसस्थानक) जागा नगरपंचायतीस नाना नानी पार्क करण्यासाठी द्यावी.

३) शिरूर (का.) येथे नवीन आगाराची निर्मिती करावी, शिरूर (का.) येथील बसस्थानकास महसूल विभागाची जागा घेऊन त्याठिकाणी बसस्थानकाचे बांधकाम करावे.

----------

===Photopath===

160621\img-20210616-wa0420_14.jpg