तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मुंबईकडे जाताना धनंजय मुंडेंच्या पत्नीचा अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:40 IST2024-10-17T14:39:01+5:302024-10-17T14:40:30+5:30

कार-ट्रॅव्हल बसमध्ये जोरदार धडक झाल्याने कारचे मोठे नुकसान; राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत

Dhananjay Munde's wife's car met with an accident on her way to Mumbai after visiting Tulja Bhawani | तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मुंबईकडे जाताना धनंजय मुंडेंच्या पत्नीचा अपघात

तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मुंबईकडे जाताना धनंजय मुंडेंच्या पत्नीचा अपघात

परळी: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारला पुणे ते सोलापूर मार्गावर गुरुवारी पहाटे अपघात झाला. ट्रॅव्हल बस सोबत कारची धडक झाल्याने अपघातात राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या आहेत. सुदैवाने या अपघातात राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली असून त्या सुखरूप आहेत.

राजेश्री मुंडे ह्या परळीहून बुधवारी दुपारी कारने निघाल्या. तुळजापूर येथे तुळजाभवानीचे त्यांनी दर्शन घेतले. तेथून त्या मुंबईकडे निघाल्या. दरम्यान, पुणे ते सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी या ठिकाणी राजश्री मुंडे यांच्या कार आणि ट्रॅव्हल बसमध्ये जोरदार धडक झाली. यात राजश्री मुंडे यांच्या कारच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या कारने त्या मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे.

Web Title: Dhananjay Munde's wife's car met with an accident on her way to Mumbai after visiting Tulja Bhawani