"त्यांना वाटलं मी राजकारणातून संपून जाईल,पण..."; मोठ्या नेत्यांच्या षडयंत्रावर धनंजय मुंडेंचे भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 18:17 IST2026-03-19T18:15:26+5:302026-03-19T18:17:13+5:30

'राज्यातील मोठ्या नेत्याने मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा कट रचला होता'; धनंजय मुंडेंचा खळबळजनक दावा

Dhananjay Munde's Shocking Claim: "Big Leaders of Maharashtra Planned to Finish My Political Career" | "त्यांना वाटलं मी राजकारणातून संपून जाईल,पण..."; मोठ्या नेत्यांच्या षडयंत्रावर धनंजय मुंडेंचे भाष्य

"त्यांना वाटलं मी राजकारणातून संपून जाईल,पण..."; मोठ्या नेत्यांच्या षडयंत्रावर धनंजय मुंडेंचे भाष्य

- संजय खाकरे

परळी (जि. बीड): "नगरपालिका निवडणुकीच्या काळात राज्यातील मोठे मोठे नेते मला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या तयारीत होते. मला बदनाम करण्यासाठी सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि यूट्यूबच्या माध्यमातून जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले," असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे. गुढीपाडव्यानिमित्त परळीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जनतेने षडयंत्र हाणून पाडले
लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात मुंडे पुढे म्हणाले की, "विरोधकांना वाटले असेल की मी संपेल, पण परळीच्या मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला. सर्व प्रकारची बदनामी सहन करूनही जनता महायुतीच्या पाठीशी ठाम उभी राहिली." यावेळी मुंडे यांनी कोणाचेही नाव न घेता राज्यातील बड्या नेत्यांवर निशाणा साधला, ज्याचे राजकीय अर्थ आता काढले जात आहेत.

वैद्यकीय सुविधा आणि घरकुलांची भेट
दुसऱ्या एका कार्यक्रमात मुंडे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेतील ६७७ पात्र लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे प्रत्येकी १ लाख रुपये वितरित करण्यात आले. तसेच रमाई घरकूल योजनेच्या २०० नवीन घरांच्या आराखड्याचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, परळीत वैद्यकीय महाविद्यालय होणार नसले तरी, गोरगरिबांसाठी अत्याधुनिक उपचार सुविधा देणारी मोठी वैद्यकीय वास्तू उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली. "पुढील तीन महिन्यांत या प्रकल्पाचे भूमिपूजन होईल," असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, डॉक्टरांनी रात्री आणि रविवारी देखील अत्यावश्यक सेवा द्यावी, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर , नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, परळी पंचायत समितीचे माजी सभापती ॲड. गोविंद  फड, बीड जिल्हा परिषद माजी गटनेते अजय मुंडे, दिव्यांग कल्याण महामंडाळचे राज्याचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, प्रभारी मुख्याधिकारी पी.एन.निगळ, प्रा. डॉ. मधुकरराव आघाव, ॲड. गोविंद फड, डॉ. मनोज मुंडे, प्रणिता मुंडे आदींची उपस्थिती होती. 

Web Title : मेरे खिलाफ साजिश नाकाम, धनंजय मुंडे ने लगाया राजनीतिक षडयंत्र का आरोप।

Web Summary : धनंजय मुंडे ने नगरपालिका चुनावों के दौरान वरिष्ठ नेताओं द्वारा उन्हें राजनीतिक रूप से खत्म करने की साजिश का आरोप लगाया। लक्षित बदनामी के बावजूद, जनता का समर्थन बना रहा। उन्होंने आवास परियोजना के लाभों और परली में एक उन्नत चिकित्सा सुविधा की योजनाओं की घोषणा की, डॉक्टरों से आवश्यक सेवाएं प्रदान करने का आग्रह किया।

Web Title : Conspiracy against me failed, Dhananjay Munde alleges political plot.

Web Summary : Dhananjay Munde alleges a conspiracy by senior leaders to politically destroy him during municipality elections. Despite facing targeted defamation, public support prevailed. He announced housing project benefits and plans for an advanced medical facility in Parli, urging doctors to provide essential services.