धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या? सुरेश धसांनी अजित पवारांना दिला पुराव्यांचा पेनड्राईव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:45 IST2025-01-30T11:43:48+5:302025-01-30T11:45:17+5:30

पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड डीपीडीची बैठक झाली. या बैठकी वेळीच भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर जे आरोप केले आहेत, त्यासंदर्भातील पुरावे दिले. 

Dhananjay Munde's problems increased? Suresh Dhas gave Ajit Pawar a pen drive of evidence | धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या? सुरेश धसांनी अजित पवारांना दिला पुराव्यांचा पेनड्राईव्ह

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या? सुरेश धसांनी अजित पवारांना दिला पुराव्यांचा पेनड्राईव्ह

Suresh Dhas Ajit Pawar Dhananjay Munde: बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. अजित पवारांच्या पहिल्या दौऱ्यात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भातील पुरावे सादर केले. धस यांनी अजित पवारांना पुराव्यांचा एक पेनड्राईव्ह दिला. महत्त्वाचं म्हणजे बीड डीपीसीची बैठक सुरू असतानाच हा पेनड्राईव्ह दिल्याने बैठकीत शांतता पसरली होती. महायुती सरकारमधील आमदारनेच पुरावे दिल्याने पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

"बीडच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सध्या पेपरला आपण असतो. त्यामध्ये जिथे तथ्य असेल, तिथे संबंधितांवर कारवाई केली जाईल. जिथे तथ्य नसेल, त्यासंदर्भात कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही", असे अजित पवार बीडमध्ये बोलताना म्हणाले. 

सुरेश धसांनी टाकला पेनड्राईव्ह बॉम्ब

सुरेश धस म्हणाले, "शंभर टक्के खरं आहे. तथ्य असेल, तरच कारवाई करावी, अशी विनंती आम्ही करणार आहे. बिगर तथ्याची नाही. मी बिगर तथ्याचं बोलतच नाही. आज कागदपत्रे आणि त्याचा पेनड्राईव्ह देणार आहे. पेनड्राईव्हमध्ये सगळेच पुरावे आहेत."

बैठकीआधी सुरेश धसांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर पीकविमा घोटाळ्यासंदर्भात केलेल्या आरोपांचे पुरावे दिले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश धस यांनी पुरावे असलेला पेनड्राईव्ह अजित पवारांकडे दिली.  

अजित पवारांनी अधिकाऱ्यांनाही दिला इशारा

"मी आधीच देवेंद्रजींना (Devendra Fadnavis) सांगितलं होतं की, मला इकडचं (बीड पालकमंत्री) देत असताना त्यासंदर्भात सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे. त्यात मी अधिकारीही बघणार नाही. काही काही अधिकाऱ्यांना इथे बरेच वर्ष झाली आहेत. त्यातही मी दुरुस्ती करणार आहे", असे म्हणत बीड जिल्ह्यात जास्त काळापासून असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे संकेतही अजित पवारांनी दिले आहेत. 

Web Title: Dhananjay Munde's problems increased? Suresh Dhas gave Ajit Pawar a pen drive of evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.