शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:34 AM

बीड : संवैधानिक पदावर असलेले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी न्यायालयाचा आदेशाचा मान ठेवून जगतमित्र सूतगिरणी प्रकरणी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा द्यावा. शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या शरद पवार यांनीही दखल घेऊन मुंडे यांच्या हातात नारळ द्यावा. धनंजय मुंडे यांचा ‘खोट बोल, पण रेटून बोल’, हा खरा चेहरा जनतेसमोर आलेला ...

बीड : संवैधानिक पदावर असलेले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी न्यायालयाचा आदेशाचा मान ठेवून जगतमित्र सूतगिरणी प्रकरणी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा द्यावा. शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या शरद पवार यांनीही दखल घेऊन मुंडे यांच्या हातात नारळ द्यावा. धनंजय मुंडे यांचा ‘खोट बोल, पण रेटून बोल’, हा खरा चेहरा जनतेसमोर आलेला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आ.सुरेश धस यांनी केली आहे.

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने संत जगतमित्र सुतगिरणी प्रकरणी संचालकांपैकी असलेले धनंजय मुंडे यांची मालकीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले असूनही धनंजय मुंडे खोटे बोलून या प्रकरणाला राजकीय वळण देऊन आपल्या बचावाचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार औरंगाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी विशेष तपास यंत्रणा (एस.आय.टी.) स्थापन करण्यात आलेली असून ही यंत्रणा अतिरिक्त पोलीस महासंचालक नियंञण असलेली आहे. त्यामुळे बीड पोलीस अधीक्षकांचा काहीही संबंध नसताना विनाकारण त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप धनंजय मुंडे हे करीत आहेत.

या सूतगिरणी आणि संचालकांच्या व्यक्तिगत मालमत्तेवर टाच असल्याचे सांगून सध्याचे आठ संचालक सध्या जात्यात असून बाकीचे सुपात आहेत. त्यांच्यावरही यथावकाश कारवाई होणार आहे. तरी उठसूट राज्य शासनावर आणि इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे धनंजय मुंडे तोंडघशी पडले असून जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. लोकांना नैतिकता शिकविणारे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेनुसारच विधान परिषद, विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी केली आहे.

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारणDhananjay Mundeधनंजय मुंडेMarathwadaमराठवाडा