शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

मोठी बातमी! मुंडे भाऊ-बहिण वैद्यनाथ कारखान्यासाठी एकत्र; सर्व २१ संचालक बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 6:11 PM

विशेष म्हणजे, संचालक मंडळासाठी तिन्ही मुंडे बहिणींनी अर्ज केला होता. तर धनंजय मुंडे यांनी अर्ज भरला नव्हता.

- संजय खाकरेपरळी: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी वैद्यनाथ  कारखान्याच्या माजी चेअरमन भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा गोपीनाथराव  मुंडे आणि राष्ट्रवादीचे माजीमंत्री धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ एकत्र आले. यामुळे २१ सदस्यांचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले. विशेष म्हणजे, संचालक मंडळासाठी तिन्ही मुंडे बहिणींनी अर्ज केला होता. तर धनंजय मुंडे यांनी अर्ज भरला नव्हता.

कारखान्याच्या संचालक पदाच्या 21 जागेसाठी नऊ मे रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. संचालक पदाच्या 21 जागेसाठी एकूण 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत 50 पैकी 13 अर्ज नामंजूर झाले होते तर 37 अर्ज मंजूर झाले. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खा. प्रीतम मुंडे यांच्यासह 16 जणांनी  आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 21 जणांचे अर्ज शिल्लक राहीले. यामुळे 21 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये बहुतांश उमेदवार पंकजा मुंडे यांच्या गटाचे आहेत. या कारखान्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केलेला नव्हता. 

बिनविरोध निवडून आलेले 21 उमेदवार: पंकजा मुंडे, यशश्री मुंडे, केशवराव माळी, वाल्मीक कराड, श्रीहरी मुंडे, रेशीम कावळे, ज्ञानोबा मुंडे, राजेश गीते, सतीश मुंडे, अजय मुंडे, पांडुरंग फड, हरिभाऊ गुट्टे, सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड ,चंद्रकेतू कराड ,शिवाजीराव गुट्टे ,शिवाजी मोरे ,सुधाकर सिनगारे ,सत्यभामा उत्तमराव आघाव, मंचक घोबाळे

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेSugar factoryसाखर कारखानेBeedबीड