Dhananjay Munde has been charged in the video clip | ‘त्या’ व्हिडीओ क्लिप प्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल
‘त्या’ व्हिडीओ क्लिप प्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

परळी : पंकजा मुंडे यांच्याबाबतीत सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडीओ क्लिपवरुन परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात परळी शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जुगलकिशोर रामपाल लोहिया यांनी पोलीस ठाण्यात स्वत: फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या मोबाईलवर सोशल मीडियावरुन पंकजा मुंडे यांच्या संदर्भात एक व्हिडीओ क्लिप पाहण्यात आली. त्यामध्ये त्यांच्याबद्दल धनंजय मुंडे यांनी अश्लील भावनेने हावभाव केले होते. १७ आॅक्टोबर रोजी धनंजय मुंडे यांनी विडा येथे केलेल्या प्रचारसभेतील भाषणाची ही क्लिप होती. एका महिलेबाबत अनुद्गार काढून अश्लीलरीत्या हातवारे करुन धनंजय मुंडे यांनी टीकाटिपणी केल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याविरुध्द मी फिर्याद दाखल केली आहे, असे जुगलकिशोर लोहिया यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
‘ती’ क्लिप बनावट आणि माझी बदनामी करणारी - धनंजय मुंडे
परळी : शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावरुन व्हायरल झालेली ती क्लिप एडीट करुन माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून, त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा. आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका, अशी विनंतीही केली. मी विरोधासाठी राजकारण करीत नाही, तर विकासासाठी करतो, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

Web Title: Dhananjay Munde has been charged in the video clip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.