'वाल्मीक कराडला तुरुंगात व्हीआयपी असल्यासारख्या सुविधा'; कोणत्या अधिकाऱ्यांवर आरोप?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 10:42 IST2025-02-28T10:39:45+5:302025-02-28T10:42:36+5:30
दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला तुरुंगात व्हीआयपी व्यक्तीसारख्या सोयी सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे देशमुख कुटुंबीयांनी घेतली आहेत.

'वाल्मीक कराडला तुरुंगात व्हीआयपी असल्यासारख्या सुविधा'; कोणत्या अधिकाऱ्यांवर आरोप?
Walmik Karad News: दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचा आरोप होत असलेला वाल्मीक कराड सध्या तुरुंगात आहे. वाल्मीक कराडलातुरुंगात विशेष व्यक्तीसारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. धनंजय देशमुख यांनी हा आरोप केला असून, यापूर्वी भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. तुरुंगातील काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे घेत आता देशमुख कुटुंबीयांनी आरोप केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वाल्मीक कराडला बीडमधील कारागृहात ठेवण्यात आले आहे. यापूर्वीही वाल्मीक कराडला विशेष व्यक्तीसारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
चहा, नाश्ता आणि विशेष खोलीत व्हिडीओ कॉन्फरन्सिग
वाल्मीक कराडला कोणत्या दिवशी किती वाजता कोणता अधिकारी वाल्मीक कराडला चहा आणि नाश्ता आणून देतो? कोणत्या दिवशी कोणत्या वेळी वाल्मीक कराड विशेष खोलीत जाऊन बसतो. तिथून तो व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे बोलणं होतं, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. धनंजय देशमुख यांनी एक पत्र तयार केले असून, त्यात वेळा आणि कर्मचाऱ्यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
वाल्मीक कराडला मोबाईल वापरण्याची सुविधा कर्मचार सुधाकर मुंडेंनी दिली आहे. वाल्मीक कराड, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनावणे यांना नियमबाह्य पद्धतीने एकाच बराकीमध्ये ठेवण्यात आले आहेत, असाही आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर तुरुंगातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत, अशी मागणीही देशमुख कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांवर आरोप?
तुरुंगातील बक्सर मुलाणी, ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, सुधाकर मुंडे हे अधिकारी-कर्मचारी वाल्मीक कराडला सहकार्य करत आहेत.