सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST2021-06-25T04:23:40+5:302021-06-25T04:23:40+5:30

.... कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरुच अंबाजोगाई : खातेनिहाय शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश दिलेले आहेत. मात्र बहुतांश कर्मचारी शहरात ...

Demand for insurance cover for all government employees | सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याची मागणी

सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याची मागणी

....

कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरुच

अंबाजोगाई : खातेनिहाय शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश दिलेले आहेत. मात्र बहुतांश कर्मचारी शहरात राहत आहेत. तिथून आपला कारभार सांभाळत आहेत. सध्या कोरोनाची महामारी सुरु आहे. नागरिक भयभीत झाले आहेत. अशावेळी किमान शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी रहावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

....

रुग्णालयात वाहनतळाची समस्या

अंबाजोगाई : कोरोनामुळे सध्या शहरातील रुग्णालये फुल्ल झाली आहेत. मात्र बहुतांश रुग्णालयांना वाहनतळच नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रुग्णालयांना वाहनतळ निर्माण करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

....

रिक्त पदांमुळे योजना पोहोचल्या नाहीत

अंबाजोगाई : कृषी विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, विविध पदे रिक्त असल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. सुधारित आकृतिबंधानुसार अनेक पदांना मंजुरी आहे. पण पदभरती झाली नाही. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अडचण होत आहे. यासाठी रिक्त पदे भरावीत.

...

जनावरांचे लसीकरण सुरू करण्याची मागणी

अंबाजोगाई : तालुक्यात व परिसरात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांना लसीकरण करण्यात येते. काही महिन्यांपूर्वी अनेक गावातील जनावरांना लम्पीची लागण झाल्याने पशुपालक त्रस्त झाले होते. त्यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विशेष अभियान राबवून लसीकरण केले. पावसाळ्यात करावयाचे लसीकरण करण्यात आलेले नाही. तरी सर्व जनावरांना लसीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख यांनी केली आहे.

Web Title: Demand for insurance cover for all government employees