दिल्लीहून रिमोटने उघडली ‘नीट’ प्रश्नपत्रांची पेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:59 PM2019-05-05T23:59:49+5:302019-05-06T00:00:25+5:30

नॅशनल इलिजिब्लिीटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) रविवारी शहरातील १७ केंद्रांवर शांततेत व सुरळीत पार पडली. यावर्षी प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रथमच डिजीटल लॉक वापरण्यात आले. सर्व उत्तर पत्रिका नीट मुख्यालयाकडे पाठवण्यात आल्या.

'Delhi' opened by remote 'questionnaires' box | दिल्लीहून रिमोटने उघडली ‘नीट’ प्रश्नपत्रांची पेटी

दिल्लीहून रिमोटने उघडली ‘नीट’ प्रश्नपत्रांची पेटी

Next
ठळक मुद्देदोन तास आधीपासूनच तपासणी : १७ केंद्रांवर पुरेशा सुविधांमुळे विद्यार्थ्यांची तणावमुक्त वातावरणात परीक्षा

बीड : नॅशनल इलिजिब्लिीटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) रविवारी शहरातील १७ केंद्रांवर शांततेत व सुरळीत पार पडली. यावर्षी प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रथमच डिजीटल लॉक वापरण्यात आले. सर्व उत्तर पत्रिका नीट मुख्यालयाकडे पाठवण्यात आल्या. यावर्षी शहरातील शाळा, महाविद्यालय अशा १७ केंद्रांवर परीक्षा झाली. दुपारी १२ वाजेपासूनच विद्यार्थी पालकांसोबत परीक्षा केंद्रांवर पोहचत होते. तपासणी करुन परीक्षा केंद्राच्या आवारात विद्यार्थ्यांना सोडण्यात येत होते.
परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ४ मे रोजी जिल्हा समन्वयक वाल्मिक सोमासे यांनी १७ केंद्रप्रमुख, १७ निरीक्षक तसेच १७ नीट प्रतिनिधींची बैठक घेऊन परीक्षेचे नियोजन केले होते. परीक्षेसाठी देण्यात आलेल्या ओळखपत्रानुसार विद्यार्थ्यांनी पालन केले होते. परीक्षा केंद्रात रांगेत प्रवेश देण्यात येत होता. केंद्राच्या परीसरात नीटच्या वतीने दिलेल्या सूचनांची माहिती दर्शविणारे बॅनर होते. प्रत्येक केंद्रांवर पंखा, पिण्याच्या पाण्यासह इतर भौतिक सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी दीड वाजता परीक्षा केंद्रांचे गेट बंद करण्यात आले होते. २ ते ५ या वेळेत विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा दिली.
विद्यार्थ्यांची झाली सोय
मागील वर्षी नीट परीक्षेसाठी बीडमध्ये ३ केंद्र होते. यंदा मात्र यात वाढ करुन १७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली. मागील वेळी निदर्शनास आलेल्या त्रुटींमध्ये सुधारणा केल्याने नवे परीक्षा केंद्र असुनही कोणतीही अडचण उद्भवली नाही, गडबड, गोंधळ झाला नसल्याचे जिल्हा समन्वयक वाल्मिक सोमासे यांनी सांगितले. तर बीडमध्ये सोय झाल्याने आर्थिक भूर्दंड टळल्याचे विद्यार्थी, पालकांनी सांगितले. अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यासाठी नीट परीक्षा केंद्राची मागणी होती. त्यानुसार यावर्षी जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांची बीड मधील १७ परीक्षा केंद्रांवर सोय करण्यात आली होती.
एवढे राहिले अनुपस्थित
नीट परीक्षेसाठी ४ हजार ९४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी अडीच ते तीन टक्के विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
सीलबंद पेट्यांना जीपीएस आधारित डिजिटल लॉक
४नीट परीक्षेसाठी प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. प्रश्नपत्रिकांच्या सीलबंद पेट्यांना जीपीएस डिजिटल लॉक होते.
४बॅँकेतून थेट परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकांची पेटी ठरवून दिलेल्या मार्गावरुन पोहचल्यानंतर केंद्रप्रमुखांनी व इतर सहकाऱ्यांनी जिल्हा समन्वयकांना रिपोर्ट केले.
४त्यानंतर परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या ४० मिनिटे अगोदर दिल्ली (नीट) येथून रिमोटद्वारे बीप वाजताच लॉक आपोआप उघडला. त्यानंतर मानवीय पध्दतीचे दुसरे कुलूप उघडण्यात आले.
४डिजीटल लॉक उघडले तरच पुढची प्रक्रिया करता येते. या जीपीएस लॉकचे वैशिष्ट्य म्हणजे जोडलेल्या बॅटरीची पॉवर दहा ते बारा दिवस टिकून राहते. जीपीएस ट्रॅकमुळे प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता परीक्षा व्यवस्थेला समजत होती.

Web Title: 'Delhi' opened by remote 'questionnaires' box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.