मोटार दुरुस्त करताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 18:30 IST2018-05-15T18:30:00+5:302018-05-15T18:30:00+5:30
तालुक्यातील वालेवाडी येथील शेतकरी भागवत बाबुराव चन्नागीरे (३९) यांचा पाण्याची मोटार सुरु करताना विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला.

मोटार दुरुस्त करताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
अंबाजोगाई (बीड ) : तालुक्यातील वालेवाडी येथील शेतकरी भागवत बाबुराव चन्नागीरे (३९) यांचा पाण्याची मोटार सुरु करताना विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १४ ) दुपार घडली.
सोमवारी वालेवाडी परिसरातील वीज गेली होती. यावेळी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भागवत चन्नागीरे हे त्यांच्या शेतात होते. वीज गेलेली असल्याने ते शेतातील पाण्याच्या मोटारचे तुटलेले वायर जोडत होते. त्याचवेळी अचानकच वीज आली आणि चन्नागीरे यांच्या हातातील वायरमध्ये विद्युत प्रवाह आल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चन्नागीरे हे तळेगांव घाट येथील राजश्री विद्यालयात लिपिक होते.