‘जैविक’चा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:10+5:302021-07-07T04:41:10+5:30

रस्त्याची दुर्दशा बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटे वस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना ...

Danger of ‘biological’ | ‘जैविक’चा धोका

‘जैविक’चा धोका

रस्त्याची दुर्दशा

बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटे वस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे लक्ष दिले जात नाही.

गॅसचा गैरवापर

बीड : घरगुती तथा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा अंबाजोगाई तालुक्यात काही लोकांनी गोरखधंदा सुरू केला आहे. अंबाजोगाई शहरातून स्वत:च्या नावावर गॅस घेऊन त्या सिलिंडरची विक्री चढ्या भावाने व्यावसायिकांना केली जात आहे.

अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष

पाटोदा : परिसरात बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. हॉटेल, पानटपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरीत्या दारूची विक्री होत आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

घंटागाडी येईना

अंबाजोगाई : शहरातील भटगल्ली, जैनगल्ली परिसरात येणारी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा पडून असतो. गाडी नियमित व वेळेवर सोडून जागोजागी स्वच्छतेची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: Danger of ‘biological’