शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘उत्सवातून आपुलकीचे अतूट नाते निर्माण करा’

By admin | Updated: September 16, 2015 12:02 IST

गणेशोत्सवातून सामाजिक उपक्रम राबविले पाहिजेत. उत्सवांकडे मौजमजा नव्हे, तर सामाजिक एकता जोपासण्याचे माध्यम म्हणून पहा,

बीड : गणेशोत्सवातून सामाजिक उपक्रम राबविले पाहिजेत. उत्सवांकडे मौजमजा नव्हे, तर सामाजिक एकता जोपासण्याचे माध्यम म्हणून पहा, असा संदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिला. प्रेमाचा संवाद व आपुलकीचे नाते निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.मंगळवारी येथे जिल्हा पोलीस प्रशासनाने आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘जातीय सलोखा’ हा कार्यक्रम घेतला. यावेळी ते बोलत होते.जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अधीक्षक अनिल पारसकर, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी आ. राजेंद्र जगताप, अ‍ॅड. शेख शफीक, सय्यद नवीदुज्जमा, विविध धर्मीय गुरू यांची मंचावर उपस्थिती होती.नांगरे पाटील म्हणाले, आमच्या लहानपणी गणेश मंडळातर्फे पुस्तकांचे वाटप व्हायचे. या पुस्तकांमुळेच आम्ही घडलो. अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. उत्सवावर दुष्काळी सावट आहे. दरवर्षी २० हजार कोटी रूपये खर्च होतो. काही प्रमाणात पर्यावरणालाही बाधा पोहोचते. त्यामुळे सदसद् विवेकबुध्दीने कामे करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बाप्पा विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आगमनाने विघ्न संपुष्टात यावेत, यासाठी प्रत्येकाने सामाजिक, जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधून दीर्घकालीन उपायांची गरज असल्याचे सांगितले. विविध धर्मगुरूंनीही मते मांडली. अधीक्षक अनिल पारसकर यांनी प्रास्ताविक केले. अभिनेता अक्षयकुमारने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पाठविलेल्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)