शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा कहर ! अंबाजोगाईत दर दोन तासाला पेटतंय सरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 20:05 IST

Corona death toll rises in Beed दोन दिवसात अंबाजोगाईत २४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला असून विशेषतः अंबाजोगाई तालुक्यात अधिक प्रादुर्भाव आहे. वाढत्या रुग्णसंख्ये सोबतच मृतांची संख्याही वाढता असल्याने भयावह परिस्थिती आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या २४ रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे. बीड जिल्ह्यात दररोज हजारांपेक्षाही अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी तर जिल्ह्यात विक्रमी १२११ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन झाले. यातील ३३७ एकट्या अंबाजोगाई तालुक्यातील आहेत. सध्या अंबाजोगाईतील स्वाराती आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये मिळून हजार पेक्षाही अधिक कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. तर, शेकडो रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र दिलासादायी असले तरी दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची आकडेवारी मात्र चिंतेत भर घालणारी आहे. शुक्रवारी आणि शनिवार प्रत्येकी १२ असे दोनच दिवसात एकूण २४ मृतदेहांवर अंबाजोगाई नगर पालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. 

आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णांचा ओढा अंबाजोगाईकडे शेजारच्या सर्व तालुक्यातून रुग्ण अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय आणि लोखंडीचे कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. हि दोन्ही ठिकाणी कोविड रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दरम्यान, या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराची जबाबदारी अंबाजोगाई नगर पालिकेची आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणारे मृत हे एकट्या अंबाजोगाई तालुक्यातील नसून त्यापैकी अनेकजण आसपासच्या तालुक्यातील रहिवासी असतात असे संबंधितांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड