राष्ट्रवादीत अध्यक्षपदाचा गोंधळ, परळीत अजित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 18:45 IST2023-05-03T18:44:21+5:302023-05-03T18:45:14+5:30
अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार धनंजय मुंडे यांच्या परळीत असे बॅनर लागल्याने चर्चेला उधाण

राष्ट्रवादीत अध्यक्षपदाचा गोंधळ, परळीत अजित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर
परळी (बीड) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडल्याचे काल जाहीर केल्याने पक्षात गोंधळाचे वातावरण आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता ते पदाधिकारी संभ्रावस्थेत असताना परळीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाने 'भावी मुख्यमंत्री अजित पवार' असे बॅनर लावल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा चालू असताना परळीत विविध भागांत 'भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार' असा उल्लेख असलेले बॅनर मंगळवारी रात्री लावण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष जाबेरखान पठाण यांनी मंगळवारी (दि. 2 ) रात्री हे बॅनर लावल्याची माहिती आहे.
'भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार' असा उल्लेख असलेल्या या बॅनरवर राष्ट्रवादीचे शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांचे फोटो आहेत. हे बॅनर आज सकाळी निदर्शनास आले. अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार धनंजय मुंडे यांच्या शहरात असे बॅनर लागल्याने राजकीय गोटात विविध अंदाज बंधने सुरु झाले. दरम्यान, हे बॅनर आज सकाळी हटविण्यात आले.
शहरात मंगळवारी रात्री 8.30 वाजता बॅनर लावले होते. मात्र, आज सकाळी वरिष्ठांच्या सूचनेनुसार बॅनर काढले आहेत
- जाबेर खान पठाण, माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, परळी