पोलीस भरतीसह स्पर्धा परीक्षा प्रलंबित; विद्यार्थी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST2021-07-20T04:23:33+5:302021-07-20T04:23:33+5:30

निवेदनात नमूद केले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे पदभरती परीक्षा नियुक्त्या रखडल्या आहेत. यामुळे ...

Competitive exams pending with police recruitment; Student harassment | पोलीस भरतीसह स्पर्धा परीक्षा प्रलंबित; विद्यार्थी हैराण

पोलीस भरतीसह स्पर्धा परीक्षा प्रलंबित; विद्यार्थी हैराण

निवेदनात नमूद केले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे पदभरती परीक्षा नियुक्त्या रखडल्या आहेत. यामुळे राज्यातील जवळपास १५ लाख विद्यार्थी हतबल झाले आहेत. कोरोनामुळे सर्वच कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यातच मागील दोन ते तीन वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यांसाठी भयावह आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे शासनाने एमपीएससी आणि महाआईटीच्या रखडलेल्या परीक्षा लवकर घ्याव्यात व अंतिम निकाल लावावेत, अशी मागणी करण्यात आली.

पोलीस भरतीची अधिसूचना जारी करावी

कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्याचे दोन वर्षे वाया गेले. त्यामुळे काही विद्यार्थ्याची वयोमर्यादा संपू शकते. त्यासाठी वयोमर्यादेची २ वर्षांची वाढ करावी व लवकर यासंबंधीचा शासन आदेश काढावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Competitive exams pending with police recruitment; Student harassment