सिद्धेश्वर कॉलेजमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:51 IST2021-02-23T04:51:26+5:302021-02-23T04:51:26+5:30

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित माजलगाव येथील श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने जागतिक सूर्यनमस्कार दिन व रथसप्तमीच्या ...

Collective sun salutation activities at Siddheshwar College | सिद्धेश्वर कॉलेजमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम

सिद्धेश्वर कॉलेजमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित माजलगाव येथील श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने जागतिक सूर्यनमस्कार दिन व रथसप्तमीच्या निमित्ताने विद्यार्थी व तरुणांमध्ये सूर्यनमस्काराविषयी जनजागृती करण्यात आली. सर्वांगीण असलेल्या या व्यायाम प्रकारातून मानसिक व शारीरिक विकास करण्याच्या हेतूने हा सामूहिक सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम घेण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ.गजानन होन्ना, प्रा.युवराज मुळ्ये, संतोष लिंबकर क्रीडा मार्गदर्शक डॉ.उमेश साडेगावकर व सर्व प्राध्यापक यांची उपस्थिती होती.

सूर्य मंडळाच्या रचनेत उभे राहत सूर्यनमस्कार

२० फेब्रुवारी रोजी मुलींसाठी तर २२ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी हा सामूहिक सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम घेण्यात आला. सूर्य मंडळाच्या रचनेमध्ये उभे राहत हे सूर्यनमस्कार घालण्यात आले. यामध्ये २५० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.

===Photopath===

220221\purusttam karva_img-20210222-wa0018_14.jpg~220221\purusttam karva_img-20210222-wa0019_14.jpg

Web Title: Collective sun salutation activities at Siddheshwar College