लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वैद्यनाथ मंदिर परिसरात स्वच्छता, ब्लॅंकेट वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 14:31 IST2023-12-12T14:28:12+5:302023-12-12T14:31:30+5:30

प्रभू वैद्यनाथाच्या विधिवत पूजेनंतर मंदीर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील गरजू लोकांना ब्लँकेट वाटप केले.

Cleanliness, distribution of blankets in Vaidyanath temple area on the occasion of birth anniversary of public leader Gopinathrao Munde | लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वैद्यनाथ मंदिर परिसरात स्वच्छता, ब्लॅंकेट वाटप

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वैद्यनाथ मंदिर परिसरात स्वच्छता, ब्लॅंकेट वाटप

परळी -लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या  जयंतीनिमित्त आज सकाळी परळीत विविध लोकोपयोगी कार्यक्रमांची भाजप नेत्या पंकजा मुंडे ,खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी  प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाने सुरुवात केली. 

प्रभू वैद्यनाथाच्या विधिवत पूजेनंतर मंदीर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील गरजू लोकांना ब्लँकेट वाटप केले. यावेळी माजी मंत्री महादेव जानकर श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट विश्वस्त राजेश देशमुख,अनिल तांदळे, वैद्यनाथ अर्बन बँकेचे चेअरमन विनोद सामत, विकास राव डूबे,संचालक प्रकाश जोशी अनिल तांदळे, भाजपा शहराध्यक्ष जुगल किशोर लोहिया,विजय वाकेकर ,उपाध्यक्ष राजेंद्र ओझा महादेव अप्पा इटके, अश्विन मोगरकर, श्रीराम मुंडे,उमेश खाडे,नितीन समशेट्टे, जयश्री गीते,बंडू कोरे,योगेश पांडकर,गोविंद चौरे, अरुण पाठक,विकास हालगे,विजयकुमार खोसे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

तसेच परळीतील मलिकपुरा भागातील हजरत मलिक शाह दर्गा इथे  चादर चढवून प्रार्थना केली. शहरातील सुगंध कुटी बौद्ध विहार इथे बौद्ध वंदना करून परिसरातील गरजू लोकांना ब्लॅंकेटचे वाटप केले.

Web Title: Cleanliness, distribution of blankets in Vaidyanath temple area on the occasion of birth anniversary of public leader Gopinathrao Munde