बूट लपवण्यावरुन लग्नात हाणामारी, नवरदेवाचे डोकं फुटले, लग्नाच्या दिवशीच तलाक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 02:19 PM2018-05-07T14:19:29+5:302018-05-07T15:18:41+5:30

महत्त्वाचे म्हणजे सासऱ्याने झालेले लग्न मोडून मुलीला तलाक घ्यायला लावला आहे.

clashesh between bride and groom realtives in beed, groom injuered | बूट लपवण्यावरुन लग्नात हाणामारी, नवरदेवाचे डोकं फुटले, लग्नाच्या दिवशीच तलाक

बूट लपवण्यावरुन लग्नात हाणामारी, नवरदेवाचे डोकं फुटले, लग्नाच्या दिवशीच तलाक

Next

बीड - लग्नात मुलीकडच्यांनी नवरदेवाचे बूट लपवून त्याच्याकडून पैसे घ्यायचे ही पद्धत आपल्याकडे आहे. परंतु याच बूट लपवण्यावरुन झालेल्या वादात चक्क नवरदेवाचेच डोके फुटल्याची घटना आहे. बीडच्या केज तालुक्यातील कुंभेफळ गावात रविवारी हा धक्कादायक प्रकार घडला.  महत्त्वाचे म्हणजे सासऱ्याने झालेले लग्न मोडून मुलीला तलाक घ्यायला लावला आहे.

सुलताना युनूस शेखचा नबी सिकंदर शेख यांच्या मुलीशी निकाह होता. पण लग्नाआधी मुलीच्या भावाने नवरदेवाचे बूट लपवल्याने वाद झाला आणि त्याचे रुपांतर मारहाणीत झाले.  मात्र, सामोपचाराने हा वाद मिटला, लग्नही झाले. पण लग्नाआधी घडलेल्या प्रकारावरुन पुन्हा वादाला सुरुवात झाली. या हाणामारीत नवरदेवाचे डोकं फुटले आणि त्याला सहा टाके पडले.  सासऱ्यानेच आपल्या हातातील लाकडाने नवरदेवावर वार केल्याचा आरोप आहे.
सुलतानवर केजच्या सरकारी रुग्णालयात उपचार केल्यावर, नवरदेवाची मंडळी युसूफ वडगाव पोलिस स्टेशनला गेली.  पोलिस स्थानकात बराच काळ तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिस दाखल झाले. मात्र शेवटी हा वाद तलाक होऊन संपला.  

Web Title: clashesh between bride and groom realtives in beed, groom injuered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड