शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एसडीएम, आरोग्य, शिक्षण, रजिस्टारसह अनेक कार्यालय प्रभारीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : येथील उपविभागीय कार्यालय, आरोग्य, शिक्षण, मुद्रांक सहनिबंधक व इतर अनेक कार्यालये प्रभारींवर सुरू ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : येथील उपविभागीय कार्यालय, आरोग्य, शिक्षण, मुद्रांक सहनिबंधक व इतर अनेक कार्यालये प्रभारींवर सुरू आहेत, तर येथील तहसीलदार, डीवायएसपी, बीडीओंकडे इतर ठिकाणचा पदभार असल्याने कार्यालयात अधिकारी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत.

येथील उपविभागीय अधिकारी हे तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पद आहे. सहा महिन्यांपूर्वी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले होते. त्यानंतर त्यांना या पदावरून बडतर्फ केल्यानंतर हे पद रिक्त असून, परळी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे येथील उपविभागीय अधिकाऱ्यांचा पदभार देण्यात आला आहे. येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांचे पद मागील ४-५ वर्षांपासून रिक्त आहे. येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार हा चार-सहा महिने वेगवेगळ्या विस्तार अधिकाऱ्यांकडे दिल्याने अनेक कामांत अडचण येत असून, शिक्षकांवर त्यांचा वचक राहिलेला दिसून येत नाही.

येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची बदली झाल्याने वडवणी येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे येथील पदभार देण्यात आला आहे, तर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे जिल्हा शल्यचिकित्सकांचा पदभार दिल्याने हे पद रिक्त आहे. येथील सहायक निबंधक मुद्रांक कार्यालयातील निबंधकाचे पद मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहे. याचा प्रभारी पदभार इतरांकडे दिल्याने या ठिकाणी अनेक वेळा आर्थिक कारणांमुळे वारंवार भांडण होत असल्याच्या घटना होत असतात.

येथील तहसीलदारांकडे वडवणी तहसील कार्यालयाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडे धारूर पंचायत समितीचा पदभार देण्यात आला आहे. येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केज येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा पदभार देण्यात आला आहे.

माजलगाव येथील अनेक कार्यालयातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. येथील अनेक अधिकाऱ्यांकडे इतर ठिकाणचा पदभार दिला आहे. यामुळे हे अधिकारी कधी इकडे तर कधी तिकडे जात-येत असल्याने तर कधी बैठक तर कधी दौऱ्यावर जावे लागत असल्याने कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना कार्यालयात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर खेटे मारण्याची वेळ येत आहे.

------

राजकारण्यांचा स्वार्थ

येथील अनेक कार्यालयांत महत्त्वाच्या पदांवर इतर ठिकाणचे अधिकारी किंवा त्याच कार्यालयातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे पदभार दिला जात आहे, तर येथील अधिकारी इतर ठिकाणचा पदभार देण्यामागे राजकारणाचा एक भाग समजला जातो. नेत्यांची ॲडजेस्टमेंट व राजकारणामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल होताना दिसत आहेत.