वृक्षांचा वाढदिवस व श्रमदान करून ‘शिवराई’चा वर्धापन दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:13+5:302021-07-07T04:41:13+5:30

मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात जैवविधतेच्या संवर्धनासाठी व पर्यावणाच्या संरक्षणाचा संकल्प करून आहेर वडगाव शिवारात निसर्गप्रेमी अभिमान खरसाडे यांनी निसर्ग ...

Celebrate the anniversary of 'Shivrai' by celebrating the birthday of trees and labor | वृक्षांचा वाढदिवस व श्रमदान करून ‘शिवराई’चा वर्धापन दिन साजरा

वृक्षांचा वाढदिवस व श्रमदान करून ‘शिवराई’चा वर्धापन दिन साजरा

मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात जैवविधतेच्या संवर्धनासाठी व पर्यावणाच्या संरक्षणाचा संकल्प करून आहेर वडगाव शिवारात निसर्गप्रेमी अभिमान खरसाडे यांनी निसर्ग भूमी संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपणाला सुरुवात केली होती. गैबी देवाच्या डोंगर परिसरात साठ किलो बिया, दोन हजार कडुनिंबाची रोपे लावली होती. एक हेक्टर जागेत संरक्षित वनप्रकल्प उभारणी केली आहे. यासाठी संजय जोगदंड, डॉ.प्रज्ञा तांबडे, संयोगिता कदम, संतोष माने यांच्यासह श्री शिवाजी विद्यालय १९९५ बॅचच्या वर्गमित्रांनी व झाडांची भिसी ग्रुपने पुढाकार घेऊन पाठबळ दिले आणि ‘शिवराई’ची संकल्पना उदयास आली. ४ जुलै रोजी या प्रकल्पाची वर्षपूर्ती होती. या निमित्ताने येथील वृक्षांचा वाढदिवस वृक्षप्रेमींच्या हस्ते पुष्पहार घालून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ‘देवराई’ ग्रुपने श्रमदान करून केली. दिवसभर वृक्ष व निसर्गप्रेमींनी शिवराई वनप्रकल्पास भेटी दिल्या. यामध्ये मराठवाडा शिक्षक संघटनेच्या वतीने राजकुमार कदम, शिवाजी शिंदे, श्री शिवाजी विद्यालय माजी विद्यार्थी ग्रुपच्या वतीने कैलास डोंगरे, फ्रेंड्स क्रिकेट क्लबच्या वतीने वाव्हळ, रणजीत, खेमाडे, नरवडे, रोटे सर व त्यांचा मित्रपरिवार, बाळासाहेब बहीर, शेख सलिम, निसर्गप्रेमी गिरीश भावले, बबलू सांगोळे, प्रकाश तावरे यांनी उपस्थित राहून श्रमदान केले. वसुंधरा बचाव मोहिमेचे पर्यावण तज्ज्ञ प्रा.मोहन परजणे, प्रा.शिवाजी खांडे यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निसर्गप्रेमी संदीप घोगे, नितीन मातकर, श्रीकृष्ण उबाळे, मळेकर बाबा यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Web Title: Celebrate the anniversary of 'Shivrai' by celebrating the birthday of trees and labor