दहा ब्रास वाळूसह ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST2021-07-04T04:23:25+5:302021-07-04T04:23:25+5:30

गेवराई : तालुक्यातील सावळेश्वर फाटा येथील राक्षसभुवन रोडवरून दहा ब्रास वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक (क्र. एम. एच.१६ सी.सी. ...

Catch the truck with ten brass sands | दहा ब्रास वाळूसह ट्रक पकडला

दहा ब्रास वाळूसह ट्रक पकडला

गेवराई : तालुक्यातील सावळेश्वर फाटा येथील राक्षसभुवन रोडवरून दहा ब्रास वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक (क्र. एम. एच.१६ सी.सी. ६६७५) गेवराई पोलिसांनी जप्त केला. २ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३० हजारांची वाळू व ७ लाखांचा ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक फौजदार अशोक शेळके यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक सिद्धार्थ भाउसाहेब गजिले (रा. निपाणी, जि. औरंगाबाद) याच्यावर गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

जमिनीच्या वादातून दाम्पत्याला मारहाण

परळी : जमिनीच्या वादातून शांताबाई दत्तू मुंडे या महिलेस चौघांनी संगनमत करत कत्तीने उजव्या मनगटावर मारुन जखमी केले, तसेच महिलेचे पती दत्तू मुंडे यांना लाकडी दांड्याने मारहाण करत जखमी केले. तालुक्यातील डाबी येथे शुक्रवारी ही घटना घडली. बळीराम मुंडे, शंकर ऊर्फ वाघ्या मुंडे, बालु मुंडे व सखुबाई मुंडे यांच्यावर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Web Title: Catch the truck with ten brass sands