शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

केज, धारूरमध्ये दिवसा ४ घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:06 AM

जिल्ह्यातील केज आणि धारुर तसेच आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे चोरट्यांनी भरदिवसा घरांना लक्ष्य केले. एकूण पाच घरे फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.

ठळक मुद्देपोलिसांना आव्हान : दिवसभरात पाच विविध घटनांमध्ये ७ लाखांचा ऐवज लांबविला

बीड : जिल्ह्यातील केज आणि धारुर तसेच आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे चोरट्यांनी भरदिवसा घरांना लक्ष्य केले. एकूण पाच घरे फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. या घटनांचा तपास करण्यासह चोऱ्यांचे सत्र थांबविण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.मंगळवारी केज शहरातील गजबजलेल्या वस्तीत असलेल्या तीन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी दिवसाढवळ्या लाखोंचा ऐवज लंपास केला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार महिन्यांपूर्वी शहरातील उमरी रोड भागातील तीन घरांचे भरदिवसा कुलूप तोडून चोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केला हाता. त्या घटनांचा तपास लागतो न लागतो तोच मंगळवारी पुन्हा शहरातील धारूर रोड भागातील सारस्वत कॉलनीमधील सुरज सोनवणे यांच्या घराचे कुलूप तोडले. चोरट्यांनी घरातील सोन्याच्या सहा अंगठ्या, एक तोळ्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याचे लॉकेट, कर्णफुले व नगदी १७ हजार असा अडीच ते तीन लाखांचा ऐवज लंपास केला. तर त्याच दरम्यान माधवनगर भागातील दीपक नान्नजकर यांच्या घरातून नगदी १५ हजार रूपये तर दिनकर पवार यांच्या घरातून नगदी ३ हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान सदरील घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांनी घटनास्थळी भेट दिली. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते.धारूर शहरातील कसबा भागात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास भर दिवसा घरफोडी झाली. चोरट्यांनी सव्वादोन लाखाचा ऐवज लंपास केला. चोरटे दुचाकीवर आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. कसबा भागातील नागनाथ शिनगारे यांच्या घरी चोरी झाली. दोन अज्ञात चोरटे दुचाकीवरून (क्र. एम.एच.४४ जे ७६३९) आले होते. घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व नगदी रक्कम मिळून दोन लाख १७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तपास पोउपनि सुरेश माळी हे करत आहे.डोंगरगणमध्ये कुटुंब शेतात चोरांनी घर फोडलेकडा : घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्याने घराचे कुलूप तोडून तीन तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. मंगळवारी भरदुपारी ही घटना आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे घडली. डोंगरगण येथे चव्हाण वस्तीवर रस्त्यालगत माजी सरपंच जालिंदर नानाभाऊ चव्हाण यांचे घर आहे. चव्हाण हे कडा येथे कामानिमित्त गेले होते. तर सदस्य शेतातील पिकांची खुरपणी करत होते.मंगळवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास अज्ञात चोरटयÞांनी दरवाज्याचे कुलूप तोडून सामान उचकले. घरातील तीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. भरदिवसा रस्त्यालगतचे घर फोडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंभोरा ठाण्याचे सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस