चालत्या बसचे कॅरिअर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:43 IST2019-03-14T00:43:04+5:302019-03-14T00:43:27+5:30
स्थानकात बस (एमएच २०/१८२६) प्रवेश करताना त्यावरील कॅरिअर कोसळले.

चालत्या बसचे कॅरिअर कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : येथील स्थानकात बस (एमएच २०/१८२६) प्रवेश करताना त्यावरील कॅरिअर कोसळले. यावेळी रस्त्यावर चालणारे प्रवासी त्या खाली नसल्यामुळे बालंबाल बचावले. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही.
काही बसेसच्या खिडकी, तसेच वाहक चालकाची आसन व्यवस्था बिकट आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील की एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर लक्ष देतील, अशी विचारणी प्रवासी करत आहेत. कुठ आहे सुरक्षा दक्षता विभाग, जो स्वतंत्र देखरेख ठेवण्यासाठी निर्माण केला आहे? ज्या गोष्टीची देखरेख ठेवणे अपेक्षित आहे, त्याची का ठेवली जात नाही? सर्रास खिळखिळ्या झालेल्या झालेल्या बस मार्गावर बळच चालकाच्या हाती दिल्या जात आहेत व त्या धावत आहेत. नकार दिला तर ‘मेमो’ मिळेल या भीतीपोटी चालक देखील त्या चालवत आहेत. जर काही प्रवाशाला काही झाले असते याची जवाबदारी कोणी घेतली असती, असे प्रवाशांचे सवाल आहेत. या ‘डबडा’ बस दुरुस्त कराव्यात जेणे करून अशा घटना घडणार नाहीत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.