शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

१० गावांतील ५०० लोकांचे घेणारे रक्त नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

बीड : आयसीएमआरच्या वतीने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) सेरो सर्वेक्षणाचा चौथ्या टप्यात सर्वेक्षण केले जात आहे. यासाठी पथक ...

बीड : आयसीएमआरच्या वतीने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) सेरो सर्वेक्षणाचा चौथ्या टप्यात सर्वेक्षण केले जात आहे. यासाठी पथक रविवारी रात्रीच जिल्ह्यात दाखल झाले आहे. सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील वेगवेगळ्या १० गावांतील ५० लोकांचे रक्त नमुने घेतले जाणार आहेत. यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या शरीरातील अँटिबॉडीज किती प्रमाणात तयार झाल्या आहेत, याची माहिती घेण्यासाठी आतापर्यंत तीन वेळा आयसीएमआरने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) सेरो सर्वेक्षण केले आहे. यात राज्यातील बीड, परभणी, नांदेड, अहमदनगर, सांगली, जळगाव या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन नागरिकांचे रक्त नमुने घेतले जात आहेत. यासाठीच सोमवारी जिल्ह्यातील १० गावांत पथक जाऊन रक्त नमुने घेणार आहे. पहिल्यांदाच जिल्हा रुग्णालयातील १०० आरोग्यकर्मींचेही रक्त नमुने घेतले जाणार आहेत. जिल्ह्यातून ५०० नमुने घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी बीड आरोग्य विभाग सज्ज झाला असून सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र काढून नियोजन करण्यास सांगितले आहे.

--

या दहा गावांत होणार सर्वेक्षण

बीड तालुक्यातील येळंबघाट, आंबेसावळी, पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा, आष्टी तालुक्यातील डोंगरगण, गेवराई तालुक्यातील पांढरवाडी, माजलगाव तालुक्यातील एकदरा, धारूर तालुक्यातील हिंगणी खुर्द, परळी तालुक्यातील धर्मापुरी, माजलगाव शहरातील वॉर्ड क्र. ४, केज शहरातील वॉर्ड क्र.७ येथील नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात येणार आहेत.

---

आयसीएमआरच्या वतीने चौथ्या टप्प्यात सेरो सर्वेक्षण केले जात आहे. जिल्ह्यातील १० गावांतून नमुने घेतले जाणार आहेत. याबाबत नियोजन आणि तयारी झाली असून पथकाला पूर्ण सहकार्य केले जाईल. सर्वांना पत्र काढून याबाबत सूचना केल्या आहेत.

-डॉ. आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.