शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या शिबिरात ४७ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST

जनतेने रक्तदान करावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले. यात महाविकास आघाडीचे सर्व घटक ...

जनतेने रक्तदान करावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले. यात महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, शिक्षण संस्था यांसह समाजातील सर्व घटकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे जाहीर आवाहन केल्यानंतर या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बापू काळे, प्रताप देवकर, शरद काळे, सिद्धार्थ साबळे यांनी पुढाकार घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत ४७ जणांनी रक्तदान केले.

यावेळी डॉ. राजेश कचरे, डॉ. राकेश जाधव, डॉ. विश्‍वजीत पवार, नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक सुनील व्यवहारे, राणा चव्हाण, दत्ता सरवदे जगन सरवदे, सय्यद ताहेर, प्रताप देवकर, शरद काळे, सिद्धार्थ साबळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या शिबिराच्या यशस्वितेसाठी अर्जुन बापू काळे मित्रमंडळाचे शेख अफीक, सचिन खरटमोल, लक्ष्मण वाघमारे, सचिन होके, सोहन अहिरे, सौरभ चव्हाण, नयन गायकवाड, शंकर साठे, रोहित साठे, ईश्‍वर काळे, सेवक खरटमोल, अभिमान साबळे, शंकर मुकुंद साठे, गणेश होके, अविनाश होके, कुंदन काळे, नितीन साठे आदींनी पुढाकार घेतला. शिबिरानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बापू काळे यांनी येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बालरोग विभागास दोन नेब्युलायझर मशीन व ओपीडी विभागास एक बीपी ऑपरेटर मशीन भेट स्वरुपात दिली. सामाजिक जाणीवेतून बांधिलकी जोपासत अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल अर्जुन काळे व शरद काळे यांचे अनेकांनी स्वागत केले आहे.

बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या सर्व शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालय रक्तपेढी विभाग यांच्या गरजेनुसार व मागणीप्रमाणे टप्प्याटप्प्याने रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे. अर्जुन बापू काळे, प्रताप देवकर, शरद काळे, सिद्धार्थ साबळे यांच्या पुढाकाराने ४७ जणांनी रक्तदान केले.

राजकिशोर मोदी (अध्यक्ष, बीड जिल्हा काँग्रेस कमिटी)