महेश नवमीनिमित्त २० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST2021-06-22T04:23:00+5:302021-06-22T04:23:00+5:30

अंबाजोगाई : येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने श्री. महेश नवमी निमित्त आयोजित शिबिरात २० दात्यांनी रक्तदान केले. माहेश्वरी ...

Blood donation of 20 people on the occasion of Mahesh Navami | महेश नवमीनिमित्त २० जणांचे रक्तदान

महेश नवमीनिमित्त २० जणांचे रक्तदान

अंबाजोगाई : येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने श्री. महेश नवमी निमित्त आयोजित शिबिरात २० दात्यांनी रक्तदान केले.

माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिन श्री महेश नवमीच्या निमित्ताने साजरा केला जातो. कोरोनाचे नियम व अटींचे पालन करीत श्री भगवान महेशचे पूजन रविवारी सकाळी निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी २० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात महिलांचाही समावेश होता.

यावेळी ललीत बजाज, राजू सारडा, राजेश दरक, भागेश तापडीया, सुमीत जाजू , सुशील रांदड, स्वप्निल लोहिया, ऐश्वर्या तोष्नीवाल, योगीता लोहिया, पूजा लोहीया, गजानन मुंदडा, निलेश सारडा, सारडा, मुन्ना सोमाणी, धीरज सोनी, मोहन तोष्णीवाल व सारडा यांनी सहभाग घेतला.

रक्तपेढीतील डाॅ. विनय नालपे,डाॅ. प्रियंका गवळी, मिर्झा, शेख बाबा, शशिकांत पारखे यांनी रक्त संकलनाचे काम केले. या कार्यक्रमासाठी जगदीश जाजू, ललीत तोष्णीवाल, डाॅ. संजय लोहिया, संतोष भंडारी, ललीत बजाज, गोविंद तापडीया, राजू सारडा, राधेशाम लोहीया, राजेश दरक यांनी विशेष परिश्रम घेतले.

===Photopath===

200621\023320210619_121002-01_14.jpg

Web Title: Blood donation of 20 people on the occasion of Mahesh Navami