इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा माजलगावात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST2021-07-05T04:21:26+5:302021-07-05T04:21:26+5:30

माजलगाव : इंधनाची दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रविवारी माजलगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. ...

Block the road of NCP in Majalgaon to protest against fuel price hike | इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा माजलगावात रास्ता रोको

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा माजलगावात रास्ता रोको

माजलगाव : इंधनाची दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रविवारी माजलगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रमेश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले. केंद्रात सत्तारूढ असलेल्या मोदी सरकारने गरिबांना केवळ आश्वासने देऊन झुलवत ठेवले आहे. आजमितीला इंधनाचे भाव गरिबांना न परवडणारे आहेत. एकीकडे केवळ आश्वासने द्यायची आणि दुसरीकडे गरिबांची पिळवणूक करायची असे धोरण केंद्र सरकारने आखले आहे, ते हाणून पाडण्याची गरज आहे. थापाड्या केंद्र सरकारचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, अशी भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंग सोळंके, नासेर खाँ पठाण, दयानंद स्वामी, कचरू खळगे, विश्वांभर थावरे, जि.प. सभापती कल्याण आबूज, पं.स. सभापती भागवत खुळे, बाजार समितीचे सभापती संभाजी शेजूळ, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष एन.टी. सोळंके, जि.प. सदस्य प्रा. प्रकाश गवते, ॲड. शरद चव्हाण, ॲड. प्रमोद तौर, नगरसेवक भागवत भोसले, मनोहर डाके, सिद्धेश्वर गोळेकर, भगवान कदम, सुनील शिंदे, संतोष काळे, राजू कुरेशी, अनवर पटेल, लतिफ नाईक आदींची उपस्थिती होती.

040721\purusttam karva_img-20210704-wa0021_14.jpg

इंधनाची दरवाढच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी माजलगाव येथे रास्तारोको आंदोलन केले.

Web Title: Block the road of NCP in Majalgaon to protest against fuel price hike