पाटोद्याजवळ भरधाव बसने दुचाकीस्वारास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:23 IST2019-02-05T12:21:21+5:302019-02-05T12:23:13+5:30
आष्टी आगारातून आज सकाळी 'आष्टी - जालना' ही बस जालन्याकडे जात होती.

पाटोद्याजवळ भरधाव बसने दुचाकीस्वारास चिरडले
पाटोदा (बीड) : आज सकाळी शहराजवळ भरधाव बसने एका दुचाकीस्वारास चिरडले. यामध्ये दुचाकीवरील परसराम मोहन आजबे (२७ रा.कुळधरण ता.कर्जत जि.अ.नगर, ह.मु.बीड) हा तरूण जागीच ठार झाला.
आष्टी आगारातून आज सकाळी 'आष्टी - जालना' ही बस जालन्याकडे जात होती. याच दरम्यान बीड-नगर रस्त्यावरून परसराम आजबे हा युवक प्रवास करत होता. शहराजवळील शंभरचिरा या ठिकाणी या भरधाव बसने परसराम यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात परसराम बस खाली चिरडला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.