केजजवळ ट्रॅक्टर- बाईकच्या अपघातात बाईकस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 18:21 IST2019-02-14T18:20:02+5:302019-02-14T18:21:19+5:30
ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असून त्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

केजजवळ ट्रॅक्टर- बाईकच्या अपघातात बाईकस्वार ठार
केज (बीड ) : धारूर रोडवरील एका जिनिंग जवळ बाईक आणि ट्रॅक्टरच्या समोरासमोरील धडकेत बाईकस्वार जागीच ठार झाला. अप्पासाहेब चाटे असे मृताचे नाव असून यात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी आहे. हा अपघात बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री अप्पासाहेब चाटे हे केज- धारूर रोडवरून प्रवास करत होते. यावेळी याच रोडवरून येणाऱ्या एका ट्रॅक्टरसोबत (एम एच 44 डी 566 ) त्यांची समोरासमोर धडक झाली. यात चाटे यांचा मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असून त्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी मृताची पत्नी अनिता चाटे यांच्या तक्रारीवरुनच ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक लोखंडे करत आहेत.