शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट: तीन आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 17:05 IST

दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद झाला आणि त्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.

Beed Sarpanch Murder Case: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना कोर्टाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरपंच देशमुख यांची हत्या करून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे आरोपी फरार झाले होते. तर आरोपींना संतोष देशमुख यांच्याविषयी माहिती देणारा सिद्धार्थ सोनवणे हादेखील फरार होता. या तीनही आरोपींना स्थानिक गु्न्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. आरोपींना आज कोर्टात हजर केल्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद झाला आणि त्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी वकिलांनी आज बाजू मांडताना म्हटलं की, या आरोपींकडून दहशत माजवून खंडणी मागितली जात असल्याने या भागात नवीन उद्योग येत नाहीत. तसंच संघटितपणे आरोपींकडून गुन्हेगारी सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकिलांकडून करण्यात आली. ही विनंती मान्य करत कोर्टाने आरोपींना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

आरोपींना पुण्यातून अटक, एक जण अजूनही फरार

संतोष देशमुख हत्या प्रकरणात यापूर्वी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांचा समावेश होता. तर आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले , कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे हे फरार होते. या आरोपींना पकडण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी करत फरार घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. दोन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.  बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल परिसरातील एका खोलीतून घुले आणि सांगळे यांना ताब्यात घेतले. मात्र आंधळे तेथून पसार झाल्याची माहिती मिळाली. देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली. मात्र, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि संतोष आंधळे हे तीन आरोपी फरारी होते. त्यांना पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी डॉ. संभाजी वायबसे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना पोलिसांनी शुक्रवारी (दि. ३) अटक केली. त्यानंतर पसार आरोपी पुण्यातील बालेवाडी परिसरात असल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले. बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल परिसरातील एका खोलीतून घुले आणि सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडBeedबीडCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय