बीड: ज्या पोलिसांनी सामान्य नागरिकांना शिस्त लावायची, त्याच खाकी वर्दीतील एका अंमलदाराने 'ऑन ड्युटी' धिंगाणा घालून पोलीस दलाची मान खाली घातली आहे. बीड शहर वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार सिद्धांत गोरे यांनी आपल्याच सहकाऱ्यांना शिवीगाळ करत गोंधळ घातल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी त्यांना सोमवारी तडकाफडकी निलंबित केले आहे.
नेमका प्रकार काय? शनिवारी सायंकाळी ड्युटीवर असताना सिद्धांत गोरे यांनी किरकोळ कारणावरून आपल्या सहकाऱ्यांशी वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की, गोरे यांनी सहकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारण्याची धमकीही दिली. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी या प्रकाराचा अहवाल वरिष्ठांना दिला. पोलीस अधीक्षकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या वर्तणुकीत तथ्य आढळले आणि सोमवारी निलंबनाचे आदेश धडकले.
इतिहास 'निलंबनाचाच'!विशेष म्हणजे, सिद्धांत गोरे हे यापूर्वीही एकदा निलंबित आणि बडतर्फ झाले होते. मात्र, मॅटमधून ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते. तरीही त्यांच्या वागणुकीत सुधारणा न झाल्याने आणि तक्रार केल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याने अधीक्षकांनी कडक पवित्रा घेतला. माजलगाव येथील लाचखोरीच्या घटनेनंतर बीड पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असतानाच, या कारवाईमुळे बेशिस्त कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
'ऑन ड्यूटी' गोंधळशनिवारी संबंधित अंमलदाराने ऑन ड्यूटी गोंधळ घालत इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती. त्यांचा अहवाल पोलिस अधीक्षकांना दिला होता. त्यावरून सोमवारी सिद्धांत गोरे यांना निलंबीत करण्यात आले आहे.- सुभाष सानप, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा बीड
अहवालानंतर निलंबनसदरील कर्मचाऱ्यावर यापूर्वीही निलंबन आणि डिसमसची कारवाई झाली होती. परंतू मॅटमधून ते परत सेवेत आले होते. आता पुन्हा त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ करत तक्रार केल्यास मारण्याची धमकी दिली होती. याचा अहवाल मागवून घेत निलंबनाची कारवाई केली.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड
Web Summary : A Beed traffic police officer, Sidhant Gore, was suspended for abusing colleagues while on duty. Superintendent Navneet Kanwat took swift action after reviewing CCTV footage confirming the misconduct. Gore had a prior suspension record, and threats to colleagues prompted the latest disciplinary measure.
Web Summary : बीड में ट्रैफिक पुलिस अधिकारी सिद्धांत गोरे को ड्यूटी पर सहकर्मियों को गाली देने के आरोप में निलंबित कर दिया गया। पुलिस अधीक्षक नवनीत कांवत ने सीसीटीवी फुटेज की समीक्षा के बाद तुरंत कार्रवाई की। गोरे का पहले भी निलंबन का रिकॉर्ड रहा है, और सहकर्मियों को धमकी देने के कारण यह अनुशासनात्मक कार्रवाई की गई।