ऐकू येतंय तरीही बनले 'कर्णबधिर'; बीड झेडपीच्या ८ शिक्षकांचे कारस्थान उघड, थेट निलंबन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:11 IST2026-03-31T13:09:58+5:302026-03-31T13:11:04+5:30

बीडमधील ८ शिक्षकांवर निलंबनाची कुऱ्हाड; खोट्या अपंगत्वाच्या आधारे लाटले शासकीय फायदे, पहा कोणाकोणावर पडली कुऱ्हाड.

Beed News: Even though they can hear, they have become 'deaf'; The conspiracy of 8 teachers of Beed Zilla Parishad is exposed, immediate suspension action is taken! | ऐकू येतंय तरीही बनले 'कर्णबधिर'; बीड झेडपीच्या ८ शिक्षकांचे कारस्थान उघड, थेट निलंबन!

ऐकू येतंय तरीही बनले 'कर्णबधिर'; बीड झेडपीच्या ८ शिक्षकांचे कारस्थान उघड, थेट निलंबन!

 

- अनिल भंडारी
बीड :
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कर्णबधिर दिव्यांगत्वाचा लाभ घेणाऱ्या आठ शिक्षकांचे बिंग अखेर अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच ॲन्ड हिअरिंग डिसॅबिलीज (दिव्यांगजन) या राष्ट्रीय संस्थेच्या तपासणीत उघडे पडले. दिव्यांगत्वाचे लाक्षणिक दिव्यांगत्वापेक्षा कर्णबधीर दिव्यांगत्व कमी असल्याचे सिद्ध झाल्याने या आठ शिक्षकांवरनिलंबनाची कारवाई करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी घेतला आहे. आता पुढच्या टप्प्यात आणखी किती दोषी आढळतात हे पाहावे लागणार आहे.

दिव्यांग कल्याण विभाग, मुंबई यांचे पत्रान्वये दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या सरळसेवा नियुक्ती, बदली, पदोन्नती, अतिरिक्त अपंग प्रवास भत्ता, व्यवसाय कर कपात सूट, आयकर कपात सूट आदींचा लाभ घेतात. परंतु या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींमध्ये दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र बाबत साशंकता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे सदर दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ९१ मध्ये लाक्षणिक दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीस अभिप्रेत असणारा कोणताही लाभ सवलत जर अन्य पात्र नसलेल्या व्यक्तीने प्राप्त करून घेतला किंवा घेण्याचा प्रयत्न केला तर संबंधित व्यक्ती २ वर्षांपर्यंत कारावास किंवा रूपये एक लक्ष दंडासाठी किंवा दोन्ही शिक्षांसाठी पात्र ठरते. या तरतुदीनुसार पडताळणी अंती अपात्र ठरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून त्याचा अहवाल दिव्यांग कल्याण आयुक्त व विभागास सादर करण्याचे निर्देश होते.

त्यानुसार बीड शिक्षण विभाग (प्रा.) अंतर्गत दिव्यांग कर्णबधिर शिक्षकांच्या दिव्यांगत्वाबाबत साशंकता निर्माण झाल्याने संबंधित शिक्षकांच्या कर्णबधिर दिव्यांगत्वाबाबत पुनर्तपासणी करण्याबाबत अली यावर जंग नॅशनल, इंस्टिट्यूट ऑफ स्पीच ॲन्ड हिअरिंग डिसॅबिलीज (दिव्यांगजन) या संस्थेत दिव्यांगत्व प्रमाणपत्राची, दिव्यांग कर्मचाऱ्यांची शारीरिक तपासणी करून त्यांच्या दिव्यांगत्वाबाबत, दिव्यांगत्वाच्या टक्केवारीबाबत पुनर्तपासणी करण्याबाबत कळविले होते. तपासणीनंतर या संस्थेकडून श्रवण मूल्यांकन अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार दोषींवर ही कारवाई करण्यात आली आहे.

दिव्यांगत्वाचे लाक्षणिक दिव्यांगत्वापेक्षा कर्णबधिर दिव्यांगत्व कमी असल्याचे सिध्द होत असून संबंधितांनी लाक्षणिक अपंगत्व असलेल्या व्यक्तीसाठीचे खोटे फायदे मिळवून त्याचा लाभ घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीने जाणीवपूर्वक फसवणुकीच्या उद्देशाने जिल्हा परिषद व शासनाची फसवणूक केल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या शिक्षकांवर येत्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

या शिक्षकांवर कारवाई, अहवाल काय सांगतो?
१) मच्छिंद्र सदाशिव वाघमारे, जि. प. प्रा. शाळा आगरनांदूर, ता. गेवराई (श्रवण मूल्यांकन अहवाल मध्यम श्रवण)
२) संतोष किसन सोनवणे, जि. प. प्रा. शाळा खांडेकर वस्ती केंद्र पाली (मध्यम श्रवण दोष)
३) दादासाहेब नानासाहेब पवार, जि. प. प्रा. शाळा, वडार कॉलनी, ता. अंबाजोगाई (दोन्ही कानांची श्रवण संवेदनशिलता सामान्य मर्यादेत)
४) विलास रामराव माचवे, जि. प. प्रा. शाळा पिंपळगाव धायगुडा, ता. अंबाजोगाई (डावा कान मध्यम, उजवा कान सौम्य श्रवणदोष)
५) विकास रामराव माचवे, जि. प. प्रा. शाळा टिळकनगर, केंद्र कारखाना, ता. अंबाजोगाई (डावा कान मध्यम, उजवा कान सौम्य श्रवण दोष)
६) युवराज चंद्रभान लांब, जि. प. प्रा. शाळा हनुमंत पिंप्री, केंद्र काळेगाव, ता. केज (डावा कान मध्यम, उजवा कान सौम्य श्रवण दोष)
७) शिवाजी देसू चव्हाण, जि. प. प्रा. शाळा जोडवाडी, ता. अंबाजोगाई (दोन्ही कान संवेदशिलता मर्यादेत)
८) अंबिका बळीराम बगाडे, जि. प. प्रा. शाळा लोणीघाट, केंद्र चौसाळा कन्या (दोन्ही कानांची श्रवण संवेदनशिलता सामान्य मर्यादेत)

Web Title : बीड: शिक्षकों ने बहरे होने का नाटक किया, घोटाला उजागर, निलंबन!

Web Summary : बीड जिला परिषद के आठ शिक्षक लाभ पाने के लिए बहरे होने का झूठा दावा करने के बाद निलंबित। एक राष्ट्रीय संस्थान के ऑडिट ने घोटाले का खुलासा किया, जिसके कारण सरकारी धोखाधड़ी के लिए विभागीय जांच और संभावित आपराधिक आरोप लगे।

Web Title : Beed Teachers Faked Deafness: Suspended After Scam Exposed!

Web Summary : Eight teachers in Beed Zilla Parishad were suspended after an investigation revealed they falsely claimed to be deaf to gain benefits. A national institute's audit exposed the scam, leading to departmental inquiry and potential criminal charges for defrauding the government.