Beed: माळेगाव शिवारात गांजाची लागवड; चार लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:05 IST2025-06-24T14:05:24+5:302025-06-24T14:05:47+5:30

या प्रकरणी युसूफवडगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Beed: Marijuana cultivation in Malegaon Shivara; Goods worth four lakhs seized, case registered against one | Beed: माळेगाव शिवारात गांजाची लागवड; चार लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

Beed: माळेगाव शिवारात गांजाची लागवड; चार लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

- मधुकर सिरसट
केज ( बीड) :
माळेगाव शिवारातील घोंगडझाडी या शेतात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 3 ते 9 फूट उंचीचे गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी 19 किलो 700 ग्राम वजन असलेली 3 लाख 94 हजार रुपये किंमतीची ही झाडे जप्त केल्याची कारवाई सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आली. 

केज येथील पोलीस उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून त्यांनी सोमवारी ( दि. 23 ) माळेगाव शिवारात पथक पाठविले. सिद्धेश्वर तुकाराम ठोंबरे ( रा सुर्डी) याच्या माळेगाव शिवारातील घोंगडझाडी या शेतात पोलिसांनी छापा टाकला. या शेतात 3 ते 9 फूट उंचीचे गांजाची झाडें मिळून आले. त्याचे वजन 19 किलो 700 ग्राम भरले असून बाजारात 3 लाख 94 हजार रुपये इतकी किंमत असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांनी लोकमतशी बोलताना दिली. पथकात नायब तहसीलदार अशोक भंडारे आणि शासकीय पंच यांचा समावेश होता. जमादार दिलीप गिते यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री साडेनऊ वाजता सिद्धेश्वर तुकाराम ठोंबरे याच्याविरुद्ध विना परवाना गांजाची झाडे लावून त्याचे संवर्धन व जोपासना केल्याच्या आरोपाखाली युसूफवडगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई 
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलीस उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकातील परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक पूजा पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे, पोलीस हवालदार बालासाहेब, पोलीस नाईक दिलीप गिते, अनिल मंदे, संपत शेंडगे, सिताराम डोंगरे यांनी केली. 

Web Title: Beed: Marijuana cultivation in Malegaon Shivara; Goods worth four lakhs seized, case registered against one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.