महादेव मुंडे हत्या प्रकरण: नार्को-ब्रेन मॅपिंग चाचण्यांचा अहवाल प्राप्त; आता ‘गुपित’ उलगडणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 16:34 IST2026-02-28T16:32:01+5:302026-02-28T16:34:16+5:30

नार्को, ब्रेन मॅपिंग अन् १५०० लोकांची चौकशी! महादेव मुंडे प्रकरणाचा सूत्रधार कोण? बीड पोलिसांचा 'हायटेक' तपास

Beed Mahadev Munde Murder Case: Narco and Brain Mapping Reports Received by SIT; Investigation in Final Stage | महादेव मुंडे हत्या प्रकरण: नार्को-ब्रेन मॅपिंग चाचण्यांचा अहवाल प्राप्त; आता ‘गुपित’ उलगडणार!

महादेव मुंडे हत्या प्रकरण: नार्को-ब्रेन मॅपिंग चाचण्यांचा अहवाल प्राप्त; आता ‘गुपित’ उलगडणार!

बीड : परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येला दोन वर्षे उलटली तरी मारेकरी अद्याप मोकाट आहेत. मात्र, आता या प्रकरणाचा तपास अंतिम आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने केलेल्या दोन साक्षीदारांच्या ‘नार्को’ आणि एकाच्या ‘ब्रेन मॅपिंग’ चाचणीचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला असून, यामुळे हत्येचे गूढ उकलण्याची शक्यता बळावली आहे.

तांत्रिक पुराव्यांच्या अभावामुळे तपासात अडथळे येत होते. त्यामुळे एसआयटीने वैज्ञानिक चाचण्यांचा आधार घेतला. मुंबईच्या पोलिस रुग्णालयात ही प्रक्रिया पार पडली. पहिल्या टप्प्यात आर्थिक व्यवहार असलेल्यांची, तर दुसऱ्या टप्प्यात महत्त्वाच्या साक्षीदारांची चाचणी करण्यात आली. याशिवाय १२ साक्षीदारांची मानसशास्त्रीय तपासणीही पूर्ण झाली आहे.

तपासाचा अवाढव्य आवाका
गेल्या सहा महिन्यांत एसआयटीने तपासाचा वेग प्रचंड वाढवला आहे. २०० लोकांची प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली. १५० संशयितांचे कॉल डिटेल्स तपासले. १५००हून अधिक लोकांच्या माहितीचे सखोल विश्लेषण केले. तसेच पिग्मी एजंट म्हणून असलेले आर्थिक व्यवहार, प्लॉटिंगचा वाद की वैयक्तिक वैमनस्य? अशा सर्व बाबींची पडताळणीही करण्यात आली आहे.

गोट्या गिते अद्याप फरार
या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गोट्या गिते हा अजूनही फरार असून, त्याच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई प्रस्तावित आहे. तो हाती लागल्यानंतर तपासाला अधिक गती मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सर्वांचे लक्ष अहवालाकडे
यापूर्वीच्या तपासातून पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागले नव्हते. आता प्राप्त झालेले हे वैज्ञानिक अहवाल आयपीएस पंकज कुमावत यांच्या उपस्थितीत उघडले जातील. या अहवालातून हत्येचा नेमका सूत्रधार कोण आणि हत्येचे कारण काय, याचे धागेदोरे मिळतात का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तपासाचे महत्त्वाचे टप्पे
चाचण्या : २ नार्को, १ ब्रेन मॅपिंग आणि १२ मानसशास्त्रीय तपासण्या पूर्ण
अहवाल : शुक्रवारी एसआयटीला प्राप्त
स्थिती : मुख्य संशयित गोट्या गिते अद्याप फरार

Web Title : महादेव मुंडे हत्याकांड: नार्को-ब्रेन मैपिंग रिपोर्ट प्राप्त; रहस्य खुलेगा!

Web Summary : महादेव मुंडे की हत्या के दो साल बाद, नार्को और ब्रेन मैपिंग रिपोर्ट से नए सुराग मिले। एसआईटी जांच तेज, वित्तीय लेनदेन और व्यक्तिगत विवादों पर ध्यान केंद्रित। मुख्य संदिग्ध गोटा गीते अभी भी फरार।

Web Title : Mahadev Munde Murder: Narco-Brain Mapping Reports Received; Mystery to Unfold!

Web Summary : Two years after Mahadev Munde's murder, narco and brain mapping reports offer new leads. SIT investigation intensifies, focusing on financial dealings and personal disputes. Key suspect Gota Gite remains at large.