- नितीन कांबळेकडा : बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावर शुक्रवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. खडीने भरलेल्या भरधाव हायवाने कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे कारने अचानक पेट घेतला आणि त्यामध्ये असलेल्या दोघांचा वेळीच बाहेर पडता न आल्याने होरपळून जागीच मृत्यू झाला. दोघेही नात्याने मुलगा आणि आई असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यातील एक दांपत्य आपल्या कारमधून बीडच्या दिशेने जात होते. याच वेळी बीडकडून डोईठाणकडे खडी घेऊन जाणाऱ्या एका भरधाव हायवाने कापशी गावाजवळ कारला समोरून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारच्या इंजिनने तात्काळ पेट घेतला.
मदत मिळेपर्यंत होत्याचे नव्हते झाले:कारने पेट घेतल्याने आत असलेल्या मुलाला आणि आईला दरवाजा उघडून वेळीच बाहेर पडता आले नाही. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले आणि मदतीसाठी लोक धावण्यापूर्वीच दोन्ही प्रवाशांचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे.
Web Summary : A speeding truck collided head-on with a car near Kapshi village in Beed, Maharashtra. The car caught fire, trapping the couple inside. Both died at the scene, burned alive. Police are investigating the tragic incident.
Web Summary : महाराष्ट्र के बीड में कापशी गांव के पास एक तेज़ गति वाले ट्रक ने एक कार को सामने से टक्कर मार दी। कार में आग लग गई, जिससे दंपति अंदर फंस गए। दोनों की मौके पर ही जलकर मौत हो गई। पुलिस मामले की जांच कर रही है।