शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

बीडमध्ये १९९० नंतर काँग्रेसचा खासदार अन् आमदार नाही; सर्व नेते भाजप, राष्ट्रवादीत गेले

By सोमनाथ खताळ | Updated: April 29, 2024 15:02 IST

जनतेशी संपर्कही होतोय कमी :

बीड : जिल्ह्यात १९९० मध्ये चार आमदार आणि १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकीत केशरकाकू क्षीरसागर यांच्या रूपाने काँग्रेसने शेवटचा गुलाल उधळला. त्यानंतर सर्व बडे नेते भाजप आणि राष्ट्रवादीत गेले. त्यामुळेच जिल्ह्यात सध्या हे दोन पक्ष मजबूत आहेत. १९५२ पासून २०१९ पर्यंत एका पोटनिवडणुकीसह १८ निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये सहा वेळा काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे तीन वेळा केशरकाकू क्षीरसागर यांनीच गुलाल उधळला आहे. त्यानंतर मात्र कोणालाही विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक जिंकता आली नाही. 

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीपासून एकवेळा राष्ट्रवादी सोडली तर बाकी सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. सध्या तरी भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष जिल्ह्यात मजबूत आहेत; तसेच खा. रजनीताई पाटील आणि माजी मंत्री अशोक पाटील यांच्याशिवाय दुसरे मोठे नेतेही नाहीत. त्यांचा केज वगळता इतर मतदारसंघात फारसा संपर्क नसल्याने कार्यकर्त्यांचे जाळे दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे दिसत आहे.

पाटील घराण्याशिवाय मोठा नेता नाहीचरजनी पाटील १९९६ मध्ये केज तालुक्यातील जवळबन जिल्हा परिषद गटाच्या सदस्या होत्या. गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असताना त्यांना भाजपमध्ये घेत लोकसभेची उमेदवारी दिली. त्यांनीही यात विजय मिळवला; परंतु लगेच १९९८ मध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना दोन वेळा राज्यसभा सदस्य केले; परंतु अद्याप तरी याचा फायदा जिल्ह्याला फारसा झालेला नाही. मोेठे प्रकल्प, उद्योगांची आजही प्रतीक्षा आहे. माजी मंत्री अशोक पाटील आणि खा. रजनी पाटील या घराशिवाय जिल्ह्यात काँग्रेसचा मोठा नेताही कोणी नाही.

१९९० मध्ये हे होते आमदार १९९० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दबदबा होता. गेवराईतील शिवाजीराव पंडित, आष्टीतून भीमराव धोंडे, चौसाळ्यातून जयदत्त क्षीरसागर आणि माजलगावातून राधाकृष्ण होके पाटील आमदार होते. १९९९ ला राष्ट्रवादी स्थापन झाल्यावर केशरकाकू क्षीरसागर यांच्यासह पंडित व इतर बडे नेते राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर राष्ट्रवादी मजबूत झाली आणि काँग्रेस डबघाईला आली.

काँग्रेसमध्ये काय कमी? काँग्रेसला जिल्ह्यात नेतृत्वाचा अभाव आहे. पाटील घराण्याचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी फारसा संपर्क नाही; तसेच नवे पदाधिकारी, कार्यकर्ते तयार करण्यासाठी काही उपाययोजना होत नसल्याचे दिसते.

जिल्ह्यात एकाही संस्थेवर वर्चस्व नाहीआतापर्यंत राजकिशोर मोदी या एकमेव नेत्यामुळे अंबाजोगाई नगरपालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व होते; परंतु मोदी यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे; तसेच खा. पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या केज नगरपंचायतीवरही वर्चस्व राखता आले नाही. राज्यसभा सदस्य वगळता इतर कोणत्याही ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व नसल्याचे दिसते.

जिल्ह्यातील काँग्रेसचे खासदार: खासदार - पक्ष - वर्षेरखमाजी धोंडिबा - भा.रा.काँ. - १९५७ द्वारकादास मंत्री - भा.रा.काँ. - १९६२ पंडित सयाजीराव त्रिंबकराव - भा.रा.काँ. - १९७१ केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस आय - १९८० केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस आय - १९८४ केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस आय - १९९१

टॅग्स :beed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४