बीडमध्ये वनविभागाचे कृत्रिम पाणवठे कोरडेठाक; संकटातील वन्यजीवांची पाण्यासाठी वस्तीकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:30 IST2026-03-12T12:29:08+5:302026-03-12T12:30:30+5:30

पाणवठ्यात साचले शेवाळ; पिण्यायोग्य पाण्यासाठी प्राण्यांची भटकंती

Beed Forest Crisis: Artificial Water Holes Run Dry; Wildlife Strays into Villages for Water | बीडमध्ये वनविभागाचे कृत्रिम पाणवठे कोरडेठाक; संकटातील वन्यजीवांची पाण्यासाठी वस्तीकडे धाव

बीडमध्ये वनविभागाचे कृत्रिम पाणवठे कोरडेठाक; संकटातील वन्यजीवांची पाण्यासाठी वस्तीकडे धाव

बीड: उन्हाचा पारा वाढत असतानाच बीड तालुक्यातील करचुंडी वनक्षेत्रात वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वनविभागाने तयार केलेले कृत्रिम पाणवठे कोरडे पडल्याने हरिण, मोर, वानर यांसारखे वन्यप्राणी पाण्यासाठी आता मानवी वस्त्यांकडे आणि गावतलावांकडे धाव घेत आहेत. यामुळे वन्यजीवांचे प्राण धोक्यात आले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

पाणवठ्यात स्वच्छ पाण्याचा अभाव
करचुंडी वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बेलगाव, पिंपरनई, फुकेवाडी आणि सोमनाथवाडी परिसरात वनविभागाने अनेक कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. मात्र, कडक उन्हामुळे हे पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. ज्या ठिकाणी पाणी शिल्लक आहे, तिथे महिनाभरापासून पाणी बदलले नसल्याने मोठ्या प्रमाणात शेवाळ साचले आहे. हे अस्वच्छ पाणी प्राण्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे.

कुत्र्यांच्या हल्ल्याचा आणि अपघाताचा धोका
पाण्याच्या शोधात वन्यजीव जंगलाबाहेर पडत असल्याने त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनांच्या धडकेत वन्यजीवांचा मृत्यू होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. "वनविभागाने केवळ नावापुरते पाणवठे न ठेवता त्यात नियमितपणे स्वच्छ पाणी सोडावे," अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी वनविभागाकडे केली आहे.

Web Title : बीड में कृत्रिम तालाब सूखे; वन्यजीव गाँवों में पानी ढूंढ रहे हैं।

Web Summary : बीड के करचुंडी वन में कृत्रिम तालाब सूखने से हिरण और बंदर जैसे वन्यजीव पानी के लिए गाँवों में जा रहे हैं। इससे उन पर कुत्तों के हमले और सड़क दुर्घटनाओं का खतरा बढ़ गया है। कार्यकर्ताओं ने वन विभाग से नियमित रूप से स्वच्छ पानी उपलब्ध कराने का आग्रह किया है।

Web Title : Beed's Artificial Ponds Dry; Wildlife Seeks Water in Villages.

Web Summary : Due to dry artificial ponds in Beed's Karchundi forest, wildlife like deer and monkeys are venturing into villages for water. This exposes them to dog attacks and road accidents. Activists urge forest department to provide clean water regularly to avert the crisis.