'एक व्हिडीओ कॉल अन् २३ लाख गेले!'; निवृत्त बँक अधिकाऱ्याला 'डिजिटल अरेस्ट' करून लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 19:37 IST2026-03-26T19:35:46+5:302026-03-26T19:37:06+5:30

मनी लाँड्रिंगची बनावट नोटीस पाठवून पेन्शनरला लुटले; लेक सतर्क निघाल्याने उघड झाला २३ लाखांचा गंडा

Beed Cyber Crime: Retired SBI Cashier from Parali Robbed of ₹23 Lakh in 'Digital Arrest' Scam | 'एक व्हिडीओ कॉल अन् २३ लाख गेले!'; निवृत्त बँक अधिकाऱ्याला 'डिजिटल अरेस्ट' करून लुटले

'एक व्हिडीओ कॉल अन् २३ लाख गेले!'; निवृत्त बँक अधिकाऱ्याला 'डिजिटल अरेस्ट' करून लुटले

बीड : परळी येथील एका ६९ वर्षीय सेवानिवृत्त बँक कॅशियरला 'मनी लाँड्रिंग' आणि 'अमली पदार्थ तस्करी'च्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून सायबर भामट्यांनी तब्बल २३ लाख ४२ हजार ८८८ रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी बीड सायबर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

बजरंगनगर, परळी येथील रहिवासी सूर्यकांत निवृत्तीराव मुंडे (सेवानिवृत्त एसबीआय अधिकारी) यांना ४ मार्च २०२६ रोजी एका अज्ञात व्हॉट्सॲप क्रमांकावरून कॉल आला. समोरील व्यक्तीने 'बँकेतून बोलत असल्याचे' सांगून मुंडे यांनी क्रेडिट कार्डवर लोन घेतल्याचे भासवले. त्यानंतर एका पोलिस गणवेशातील व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून, मुंडे यांचे नाव 'संदीपकुमार मनी लाँड्रिंग' आणि 'अमली पदार्थ तस्करी' प्रकरणात आल्याचे सांगून बनावट नोटीस पाठवली. मुंडे पूर्णपणे घाबरल्याचा फायदा घेत भामट्यांनी चौकशीच्या नावाखाली विविध बँक खात्यांवर पैसे भरण्यास भाग पाडले. भामट्यांनी तब्बल २३ लाख रूपये ऑनलाइन लुटले.

मुलगी सतर्क निघाल्याने प्रकार उघडभामट्यांनी आणखी अडीच लाखांची मागणी केल्यानंतर, मुंडे आपल्या मुलीकडे पैसे मागायला गेले. मुलीने ती नोटीस पाहताच ती बनावट असल्याचे ओळखले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुंडे यांनी १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधला आणि बीड सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

...असे उकळले पैसे

५ मार्च : मालमत्ता चौकशीसाठी ५,४३,८८८ रुपये.
७ मार्च : सोन्याच्या दागिन्यांच्या चौकशीसाठी ४,९९,००० रुपये.१० मार्च : पेन्शन खात्याच्या चौकशीसाठी १,००,००० रुपये.
११ मार्च : भरलेले पैसे परत मिळवण्यासाठी पुन्हा २,५०,००० रुपये.१३ ते १८ मार्च : आरबीआय चौकशी आणि अटकेची भीती दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर ९,५०,००० रुपये ट्रान्सफर करून घेतले.

Web Title : वीडियो कॉल घोटाला: सेवानिवृत्त बैंकर को साइबर धोखाधड़ी से ₹23 लाख का नुकसान

Web Summary : बीड के परली के एक सेवानिवृत्त बैंक अधिकारी को साइबर धोखेबाजों से ₹23.42 लाख का नुकसान हुआ। पुलिस के रूप में प्रतिरूपण करते हुए, उन्होंने जांच के बहाने धन निकालने के लिए एक नकली मनी लॉन्ड्रिंग मामले का इस्तेमाल किया, जब तक कि उनकी बेटी ने घोटाले का पर्दाफाश नहीं कर दिया।

Web Title : Video Call Scam: Retired Banker Loses ₹23 Lakh to Cyber Fraud

Web Summary : A retired bank officer from Parli, Beed, lost ₹23.42 lakh to cyber fraudsters. Impersonating police, they used a fake money laundering case to extort funds under the guise of investigation, until his daughter exposed the scam.